शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांचं नागरिकत्त्व रद्द करणाऱ्या काँग्रेसने आरशात तोंड बघावं - नरेंद्र मोदींचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 13:22 IST

काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचे नागरिकत्त्व हिसकावून घेत त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता. देशद्रोह्यांबद्दल मानवता दाखवणाऱ्या काँग्रेसने आरशात तोंड बघावं असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर येथील सभेत केला

औसा - काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचे नागरिकत्त्व हिसकावून घेत त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता. देशद्रोह्यांबद्दल मानवता दाखवणाऱ्या काँग्रेसने आरशात तोंड बघावं असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूर येथील सभेत केला. लातूर येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा भरविण्यात आली होती. यावर पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. 

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचं कलम रद्द करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली आहेत तेच पाकिस्तानला हवं आहे. जम्मू काश्मीरमधून सैन्यांचा अधिकार काढून टाकणार तेच पाकिस्तानला हवं आहे. पाकिस्तानला जे जे हवं तेच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. जे देशाच्या विरोधात बोलतील त्यांच्याविरोधात असणारं देशद्रोहाचं कलमही काँग्रेस रद्द करण्याचं आश्वासन देते. पाकिस्तानला पुरक भूमिका घेण्याचं काम काँग्रेसकडून होते. दहशतवाद्यांशी मानवता दाखविणाऱ्या काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला होता अशी आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढली.

तसेच घराणेशाहीवर टीका करतानाही बाळासाहेब ठाकरे यांचा दाखला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. बाळासाहेबांना वाटलं असतं तर बाळासाहेब स्वत: मुख्यमंत्री होऊ शकले असते, जर बाळासाहेबांना वाटलं असतं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले असते मात्र बाळासाहेबांनी लोकांसाठी आपलं जीवन समर्पित केलं, त्यांनी घराणेशाहीचा मार्ग अवलंबला नाही असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

एकीकडे आमचा सशक्त भारत बनविण्याचा संकल्प आहे तर दुसरीकडे काँग्रेसचं देशविरोधी घोषणापत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज फक्त योद्धा नव्हते तर ते उत्तम प्रशासकही होते. त्यांच्या विचारांवर चालण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

...म्हणून बाळासाहेबांना मतदानाचा हक्क काढला होता द्वेषाचे आणि तिरस्काराचे राजकारण केल्याचा ठपका ठेवत केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मतदान करणे आणि निवडणूक लढवणे यावर बंदी घातली होती. निवडणूक आयोगाने 28 जुलै 1999 मध्ये बाळासाहेबांवर 6 वर्षासाठी मतदान करण्यावर बंदी आणली होती. यानंतर 2006 मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेVotingमतदानlatur-pcलातूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019