केंद्र सरकारच्या विराेधात रेणापुरात काँग्रेसची निदर्शने

By हरी मोकाशे | Updated: March 8, 2023 17:33 IST2023-03-08T17:33:38+5:302023-03-08T17:33:54+5:30

न स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर रेणापूर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने आंदोलन

Congress protests in Renapur against the central government | केंद्र सरकारच्या विराेधात रेणापुरात काँग्रेसची निदर्शने

केंद्र सरकारच्या विराेधात रेणापुरात काँग्रेसची निदर्शने

रेणापूर : केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने बुधवारी निदर्शने करण्यात आली.

केंद्रातील मोदी सरकारने निवडक उद्योगपतींवर मेहरबानी दाखवित सामान्य माणसांचा कष्टाचा पैसा धोक्यात आणला आहे. केंद्र सरकारने काही उद्योगपतींसाठी नियम बदलले आहेत, असा आरोप करीत अदानी उद्योग समुहातील कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी करीत हे आंदोलन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर रेणापूर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने बुधवारी करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाही देण्यात आल्या.

आंदोलनात लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष तथा रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, शहराध्यक्ष मतीन अली सय्यद, संगांयोचे अध्यक्ष गोविंद पाटील, काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष हणमंत पवार, माजी संचालिका इंदुबाई इगे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा पूजा इगे, बाळासाहेब करमुडे, अनिल पवार, अजय चक्रे, पद्म पाटील, रमेश बोने, शिवाजी गाडे, सचिन इगे, प्रदीप काळे, महेश खाडप, तानाजी सूर्यवंशी, राज खाडप, ॲड. शेषेराव हाके, ॲड. मोहन सिरसाट, पंडित माने, गणेश सौदागर, दादाराव कांबळे, रोहित गिरी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title: Congress protests in Renapur against the central government