औरादवर काँग्रेसच्या मोहन भंडारे यांचे वर्चस्व कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:21 IST2021-01-19T04:21:55+5:302021-01-19T04:21:55+5:30

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील सर्वात माेठी ग्रामपंचायत असलेल्या औराद शहाजानी येथील १७ पैकी १० जागांवर दणदणीत विजय मिळवित ...

Congress' Mohan Bhandare continues to dominate Aurad | औरादवर काँग्रेसच्या मोहन भंडारे यांचे वर्चस्व कायम

औरादवर काँग्रेसच्या मोहन भंडारे यांचे वर्चस्व कायम

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील सर्वात माेठी ग्रामपंचायत असलेल्या औराद शहाजानी येथील १७ पैकी १० जागांवर दणदणीत विजय मिळवित काँग्रेसचे माजी सरपंच माेहनराव भंडारे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. चुरशीच्या निवडणुकीत भंडारे यांना मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. वलांडे पॅनलचे ३, भाजपचे डाॅ. मल्लिकार्जुन शंकद गटाचे २, तर आघाडीचा एक उमेदवार विजयी झाला आहे.

औराद शहाजानी ग्रामपंचायतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. येथे सत्ताधारी विरुद्ध इतर सर्व पॅनल अशी लढत झाली होती. परंतु, मतदारांनी माजी सरपंच मोहनराव भंडारे यांच्यावर विश्वास ठेवत संपूर्ण बहुमत दिले आहे. यात वाॅर्ड क्र. २ मधून महेश भंडारे, गंगूबाई अंतररेड्डी, शालूबाई बोंडगे, वाॅर्ड क्र. २ मधून रवींद्र गायकवाड, मुल्ला दाऊत खादरसाब, अर्चना राहुल मोरे, वाॅर्ड ३ मधून सराफ हाजिवजीयोद्दीन रियाजाेद्दीन, मनीषा जीवन कांबळे, वाॅर्ड ४ मधून अशोक वलांडे, अन्सरबी वल्लीपाशा शेख, निकिता अशोक डाेंगे, वॉर्ड ५ मधून शिवपुत्र आग्रे, माधुरी प्रदीप पाटील, महादेवी नागेश हिरेमठ, वॉर्ड ६ मध्ये अपक्ष कन्हैया पाटील, आरती बालाजी भंडारे, राजीव पाटील हे विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांत तरुणांचा अधिक समावेश आहे. या निवडणुकीत आजी- माजी सरपंच, सदस्यांची प्रतिष्ठा पणाला लागली हाेती.

Web Title: Congress' Mohan Bhandare continues to dominate Aurad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.