रेणापुरात काँग्रेसचे किसान संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:21 IST2021-02-11T04:21:23+5:302021-02-11T04:21:23+5:30

तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली येथील रेणुकादेवी मंदीर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी कृषी ...

Congress Kisan Sammelan in Renapur | रेणापुरात काँग्रेसचे किसान संमेलन

रेणापुरात काँग्रेसचे किसान संमेलन

तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली येथील रेणुकादेवी मंदीर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती उमाकांत खलंग्रे होते. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, रेणा कारखान्याचे संचालक धनराज देशमुख, पंडित माने, सेवा दल तालुकाध्यक्ष हणमंत पवार, रेणा कारखान्याचे माजी संचालक विश्वासराव देशमुख, प्रकाश सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी दिल्लीतील आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. देशाचा पोशिंदा म्हणून ओळख असणाऱ्या शेतकरी बांधवांचा तालुका कॉंग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. यात प्रगतशील शेतकरी गोविंद पाटील, प्रदीप मिरजकर, मनोहर माने, मनोहर व्यवहारे ( रेणापूर), बालाजी हाके पाटील (भोकरंबा), संदीप पाटील (मोटेगाव), सिद्धेश्वर कागले, सोमनाथ गौड (खरोळा), गोविंद करमुडे (खलंग्री), अंकुश माने (हारवाडी)

दिलीप बोडके, ज्ञानोबा पवार, त्र्यंबक भालेराव यांचा समावेश होता.

यावेळी प्रमोद कापसे, मतीन अली सय्यद, जनार्धन माने, शिवाजी गाडे, प्रदीप काळे, नगरसेवक भूषण पनुरे, प्रेमनाथ मोटेगाव, अनिल पवार, पाशामियाँ शेख, विश्वनाथ कागले, ॲड. शेषराव हाके, प्रदीप गौंड, रोहित गिरी, आशादुल्ला सय्यद, महादेव उबाळे, खैसरअली सय्यद, महादेव बरिदे यांच्यासह युवक काँग्रेस, विलासराव देशमुख युवा मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बाधंव उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन इगे यांनी केले. आभार जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव प्रमोद कापसे यांनी मानले.

केंद्र सरकारच्या धोरणांवर संताप...

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. दरम्यान, केंद्र सकारने तीन नवीन कायदे मंजूर करुन भांडवलदारांचे हित जोपासत आहे. या कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे संमेलन घेण्यात आल्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव यांनी सांगून केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला.

Web Title: Congress Kisan Sammelan in Renapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.