रेणापुरात काँग्रेसची सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:28+5:302021-07-14T04:23:28+5:30
या सायकल रॅलीला पिंपळफाटा येथून सुरुवात झाली. रॅलीत बैलगाडीसह आराधी मंडळ व कार्यकर्त्यांनी घोषणा देत कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील ...

रेणापुरात काँग्रेसची सायकल रॅली
या सायकल रॅलीला पिंपळफाटा येथून सुरुवात झाली. रॅलीत बैलगाडीसह आराधी मंडळ व कार्यकर्त्यांनी घोषणा देत कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास अभिवादन करून बाजार मैदानातून ग्रामदैवत रेणुकामातेची पूजा करून केंद्रातील सरकारला सद्बुद्धी येऊ दे असे साकडे घातले.
रॅलीत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, तालुका संजय गांधी निराधार अनुदान समितीचे अध्यक्ष गोविंद पाटील, शहराध्यक्ष मतीन अली सय्यद, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष रमेश सूर्यवंशी, माजी सभापती प्रदीप राठोड, बाळकृष्ण माने, नगरपंचायतचे गटनेते पद्म पाटील, माजी संचालक कमलाकर अकनगिरे, पंडित माने, तालुकाध्यक्ष अजय चक्रे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा पूजा विशाल इगे, संगायोचे सदस्य प्रशांत अकनगिरे, महादेव उबाळे, सरपंच रामहरी गोरे, दिनेश पाटील, नगरसेवक भूषण पनुरे, पाशामियाँ शेख, लक्ष्मण भिसे, सचिन इगे, प्रदीप काळे, विश्वनाथ कागले, सेवा दलाचे खैसरअली सय्यद, रमेश बोने, नागनाथ दळवी, राहुल नागरगोजे, मनोहर व्यवहारे, रहिम अली सय्यद, पंडित कातळे, बिभीषण कदम, किशोर जाधव, भीमाशंकर सावंत, बालाजी सावंत, काशिनाथ फुलमाळी, अतुल बोडके, गणेश जाधव, गोविंद जाधव, रानबा सावंत, शरद सावंत, प्रदीप सावंत, सोमनाथ सावंत, अकुंश जाधव यांच्यासह तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
120721\1659-img-20210712-wa0038.jpg
काँग्रेसच्यावतीने पिंपळ फाटा ते रेनापुर महागाईविरोधात सायकल रॅली काढताना काँग्रेसचे कार्यकर्ते