संभाजी भिडेचा काँग्रेसकडून निषेध; राज्य शासनाने कारवाई करण्याची मागणी
By आशपाक पठाण | Updated: July 29, 2023 18:19 IST2023-07-29T18:19:23+5:302023-07-29T18:19:38+5:30
अमरावती जिल्ह्यात बडनेरा येथील एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्ये केले. हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

संभाजी भिडेचा काँग्रेसकडून निषेध; राज्य शासनाने कारवाई करण्याची मागणी
लातूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. महात्मा गांधी चौकात झालेल्या आंदोलनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भिडे यांचा जाहीर निषेध केला.
अमरावती जिल्ह्यात बडनेरा येथील एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्ये केले. हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. सर्वधर्मसमभाव ही आपल्या देशाची ओळख असून ती पुसण्यासाठी काही लोक प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष स्वाती जाधव, अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. फारूख शेख, पृथ्वीराज सिरसाट, विद्याताई पाटील, जमालोद्दीन मणियार, तबरेज तांबाेळी, ॲड. देवीदास बोरूळे, बिभीषण सांगवीकर, कुणाल येळीकर, अकबर माडजे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.