केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:21 IST2021-02-11T04:21:14+5:302021-02-11T04:21:14+5:30
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यात सांबप्पा महाजन, चंद्रकांत मद्दे, आनंद झांबरे, संतोष पाटील, ॲड. ...

केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यात सांबप्पा महाजन, चंद्रकांत मद्दे, आनंद झांबरे, संतोष पाटील, ॲड. धनंजय कोरे, निलेश देशमुख, हुसेन शेख, सलीम तांबोळी, राजकुमार, गंगाधर केराळे, रामराव पाटील, सिताराम मोठेराव, विकास महाजन, सुभाष मोठेराव, नरसिंग वाघमारे, रमेश मोगले, समीर शेख, योगेश भोसले, धनंजय झांबरे आदी सहभागी झाले होते.
यावेळी विलासराव पाटील म्हणाले, केंद्र सरकार हे भांडवलदारांचे असून भाजपाच्या काळात महागाई प्रचंड वाढली. पेट्रोल, डिझेलच्या किंमती भरमसाठ वाढत आहेत. गॅसच्या दरात वाढ झाली. केंद्र सरकारने जे कृषी कायदे मंजूर केले आहेत, ते शेतकऱ्यांसाठी घातक आहेत. यावेळी काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार बालाजी चितळे यांना देण्यात आले.