पावसाअभावी पिके वाळू लागल्याने चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:14 IST2021-07-02T04:14:19+5:302021-07-02T04:14:19+5:30
मृगाच्या प्रारंभी झालेल्या पावसावर जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात केली. तालुक्यात एकूण पेरणीयोग्य क्षेत्र २५ हजार हेक्टर असून, ...

पावसाअभावी पिके वाळू लागल्याने चिंता
मृगाच्या प्रारंभी झालेल्या पावसावर जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात केली. तालुक्यात एकूण पेरणीयोग्य क्षेत्र २५ हजार हेक्टर असून, त्यापैकी १० ते १२ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या, तसेच काही शेतकरी पेरण्यांच्या तयारीत होते; परंतु गेल्या १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे उगवलेली कोवळी पिके आता वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला असून, आतापर्यंत तालुक्यात २५४.३ मिमी पाऊस झाला आहे. जूनच्या सुरुवातीस पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता; परंतु आता १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे उगवलेली पिके करपू लागली आहेत. परिणामी, पेरणी केलेल्या क्षेत्रावर नांगर फिरवावा लागणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.