जळकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:24 IST2021-08-24T04:24:50+5:302021-08-24T04:24:50+5:30
जळकोट तालुक्यात लिंगायत भवन बांधकामासाठी ५० लक्ष, बौद्ध विहार बांधकामासाठी ५० लक्ष व अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृहासाठी ५०लाख ...

जळकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
जळकोट तालुक्यात लिंगायत भवन बांधकामासाठी ५० लक्ष, बौद्ध विहार बांधकामासाठी ५० लक्ष व अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक सभागृहासाठी ५०लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. मुस्लीम बांधवांसाठी शादीखाना, स्मशानभूमी संरक्षक भिंतीसाठीही निधी उपलब्ध करून दिले जाईल. शहराच्या अंतर्गत रस्त्यासाठी निधी आणून सर्व रस्ते पक्के करण्यात येतील. तालुक्यातील विविध गावात रस्ते दुरुस्ती व इतर कामासाठी मूलभूत योजनेअंतर्गत निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. जळकोट शहरातील प्रशासकीय इमारतीसाठी १६ कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून शासकीय विश्रामगृहासाठी सात कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचेही राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, चेअरमन अशोक डांगे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मन्मथअप्पा किडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, तालुकाध्यक्ष सत्यवान पाटील, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, धनंजय ब्रह्मंना, दिलीप कांबळे, गोविंद माने, आकाश वाघमारे, श्याम डांगे, दस्तगीर शेख आदीजण उपस्थित होते.