सताळा-सताळवाडी रस्ता कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:36 IST2021-03-13T04:36:15+5:302021-03-13T04:36:15+5:30
सताळा शिवारातील शिव, पाणंद रस्ते खुले करावेत, या मागणीसाठी ८ मार्चपासून सताळाच्या सरपंच सुवर्णाताई बैकरे यांनी शेतक-यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ...

सताळा-सताळवाडी रस्ता कामास प्रारंभ
सताळा शिवारातील शिव, पाणंद रस्ते खुले करावेत, या मागणीसाठी ८ मार्चपासून सताळाच्या सरपंच सुवर्णाताई बैकरे यांनी शेतक-यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. तिसऱ्यादिवशी प्रशासनाने मंडल अधिकारी दहिफळे, तलाठी जायेभाये यांना पाठवून देऊन प्रत्यक्ष मोजणी करून सताळा ते सताळवाडी रस्त्याच्या कामास सुरुवात केली.
गाव व परिसरातील सर्व पाणंद, शिव व नकाशावरील रस्त्यांचे प्रत्यक्ष मोजणी करून ते खुले करण्याचे आश्वासन निवासी जिल्हाधिकारी ढगे, तहसीलदार कुलकर्णी यांनी दिले. या उपोषणात सरपंच सुवर्णाताई बैकरे, उपसरपंच विठ्ठल खलसे, सदस्या शालिनीताई काळे, कुशाबाई चंदे, बालाजी बैकरे, शेतकरी संजय सोमवंशी, महादू बेद्रे, राहुल महाळंकर, राजासाहेब शेख, नरसिंग मुंडे, सोमनाथ काळे, शिवाजी काळे, अविनाश काळे, संदीप बैकरे, अशोक शिंदे, राहुल मुंडे सहभागी झाले होते. प्रत्यक्ष मोजणीवेळी सुधीर मुदगडे, सिदाप्पा मुदगडे, शंकर हिंडे, विश्वनाथ सोमवंशी, दिलीप शिंदे, अशोक काळे, दिगांबर लव्हाळे, सोमनाथप्पा करविले, विश्वनाथप्पा कलशेट्टी, भागवत सोमवंशी, देविदास चंदे आदी शेतकरी उपस्थित होते.