उदगीर, अहमदपूर, औश्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:17 IST2021-01-17T04:17:39+5:302021-01-17T04:17:39+5:30
उदगीर येथील सामान्य रुग्णालयात या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्ष बस्वराज ...

उदगीर, अहमदपूर, औश्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ
उदगीर येथील सामान्य रुग्णालयात या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, बसवराज पाटील नागराळकर, पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव मुळे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, तहसीलदार रामेश्वर गोरे, पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश हरिदास, कोरोना रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ.शशिकांत देशपांडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार, डॉ.शशिकांत डांगे आदी उपस्थित होते.
यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ.माले यांनी शनिवारी जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या लसीकरणासंदर्भात माहिती दिली. डॉ.हरिदास यांनी येथील सामान्य रुग्णालयात राबविलेल्या लसीकरण मोहिमेची माहिती देऊन, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यासाठीची तयारी कशा पद्धतीने करण्यात आली आहे, याची माहिती दिली.
यावेळी नगरसेवक ॲड.दत्ताजी पाटील, गणेश गायकवाड, डॉ.स्वाती सोनवणे, मंडळ अधिकारी शंकर जाधव आदी उपस्थित होते.
मोफत लसीकरणासाठी पाठपुरावा...
राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, वर्षभरापासून आपण कोरोनाशी लढत आहोत. एक वर्षानंतर लस तयार झाली असून, त्याचा फायदा महाराष्ट्रातील सर्वसामान्यांपर्यंत झाला पाहिजे. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणा, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात शासकीय यंत्रणा व थेट संपर्कात जाणारे कर्मचारी, वयोवृद्ध नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर, ही लस सर्वसामान्य नागरिकांनाही मोफत मिळाली पाहिजे, यासाठी मी प्रयत्नशील आहे.