कोरोना महामारीत निराधार झालेल्या मुलांच्या संगोपन, शिक्षणासाठी पुढे या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST2021-06-09T04:24:26+5:302021-06-09T04:24:26+5:30

लातूर : कोविड-१९च्या महामारीमुळे देशच नव्हे, तर जग त्रस्त झाले आहे. या महामारीत अनेक लहान मुलं निराधार झाली आहेत. ...

Come forward for the upbringing and education of the children who became destitute in the Corona epidemic | कोरोना महामारीत निराधार झालेल्या मुलांच्या संगोपन, शिक्षणासाठी पुढे या

कोरोना महामारीत निराधार झालेल्या मुलांच्या संगोपन, शिक्षणासाठी पुढे या

लातूर : कोविड-१९च्या महामारीमुळे देशच नव्हे, तर जग त्रस्त झाले आहे. या महामारीत अनेक लहान मुलं निराधार झाली आहेत. लातूर जिल्ह्यात जवळपास १७७ मुले निराधार असल्याचे समजते. अशा मुलांच्या संगोपन आणि शिक्षणासाठी शैक्षणिक संस्था व दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन लातूरचे धर्मादाय सहआयुक्त बी. डी. कुलकर्णी यांनी केले आहे. कोरोना महामारीत निराधार झालेल्या मुलांना शिक्षण देऊन समाजाच्या मूळ प्रवाहात ठेवणे आवश्यक आहे. त्याकरिता विविध शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलावी, यासाठी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाच्यावतीने ऑनलाईन बैठक घेण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी पत्करून विविध शैक्षणिक संस्था व दानशूर व्यक्तींनी अशा मुलांच्या संगोपन व शिक्षणासाठी पुढे येणे गरजेचे आहे. कोरोना महामारीत वडील, आई गमावलेल्या मुलांच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी घेऊन या मुलांना समाज जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्था चालकांची बैठक घेतली जाणार असल्याचे धर्मादाय सहआयुक्त बी. डी. कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Web Title: Come forward for the upbringing and education of the children who became destitute in the Corona epidemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.