जिल्ह्याचे हवामान तुतीच्या वाढीस पोषक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:21 IST2021-02-11T04:21:29+5:302021-02-11T04:21:29+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत महारेशीम अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या रथास अप्पर जिल्हाधिकारी लोखंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून ...

जिल्ह्याचे हवामान तुतीच्या वाढीस पोषक
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत महारेशीम अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या रथास अप्पर जिल्हाधिकारी लोखंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून या अभियानाचा प्रारंभ केला, यावेळी ते बोलत होते. लोखंडे म्हणाले, शेतकऱ्यांनी रेशीम शेती योग्य पद्धतीने केल्यास प्रतिमहा चांगले उत्पादन मिळू शकते. रेशीम शेतीला प्रोत्साहन मिळावे, म्हणून शासनाकडून मनरेगाअंतर्गत तुती लागवडीसाठी तीन वर्षांत अनुदान दिले जाते. १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करून महारेशीम अभियानात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमास जिल्हा रेशीम अधिकारी एन.बी. बावगे, मनेरगाचे गटविकास अधिकारी कुलकर्णी यांच्यासह रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
मुरुड येथे कोष खरेदी बाजारपेठेचे नियोजन...
उप कृषी उत्पन्न बाजार समिती मुरुड येथे कोष खरेदीची बाजारपेठ सुरू करण्याचे नियोजन आहे, तसेच सध्याही मुरुड येथील बाजारपेठेत व्यापाऱ्याकडून रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले कोष खरेदी केले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक स्तरावरच बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. रेशीम उत्पादनासाठी शेतकऱ्यांना बिनव्याजी दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून, शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन जिल्हा रेशीम अधिकारी एन.बी. बावगे यांनी केले.