नागरिकांनी नियमांचे पालन करावे, आरोग्य प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:19 IST2021-05-23T04:19:17+5:302021-05-23T04:19:17+5:30
येथील साईभक्तांच्या वतीने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी साई प्रसाद (रात्रीचे भोजन) हा उपक्रम येथील ग्रामीण रुग्णालयात सुरु करण्यात आला आहे. ...

नागरिकांनी नियमांचे पालन करावे, आरोग्य प्रशासन सज्ज
येथील साईभक्तांच्या वतीने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी साई प्रसाद (रात्रीचे भोजन) हा उपक्रम येथील ग्रामीण रुग्णालयात सुरु करण्यात आला आहे. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम कोंडगिरे, डॉ. संग्राम नरवटे, डॉ. हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.
साई प्रसादसाठी डॉ. संजय स्वामी, राधाकिशन तेलंग, संदीप अंकलकोटे, पांडुरंग पोलावार, सिद्धेश्वर पवार, ओम लोया, मधुकर कांबळे, सतीश गाडेकर, दत्तात्रय बेंबडे, समाधान जाधव यांनी पुढाकार घेतला आहे. स्वखर्चातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी डॉ. माले म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट व काळी बुरशी यापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. येथील कोरोना रुग्णांना उपचारासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नागरिकांच्या सहकार्याशिवाय ही लढाई जिंकता येणार नाही.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख म्हणाले, सव्वा वर्षापासून कोरोनाचे संकट सुुरु आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून रुग्णांना आरोग्य सेवा देत आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा व अधिकाऱ्यांची मदतही मिळत आहे. यावेळी अमोल हुडगे, गीता केंद्रे, रोहण जाधव, अंजली काळे, लैलाबी पटवाडे, सुरेश कांबळे या आरोग्य सेवा देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.