पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण, भर उन्हात भटकंती सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:20 IST2021-05-26T04:20:47+5:302021-05-26T04:20:47+5:30
जळकोटात महामार्गाचे काम सुरू आहे. परिणामी, शहरातील जलवाहिनी काही ठिकाणी फुटली आहे. तसेच वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शहरात ...

पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण, भर उन्हात भटकंती सुरू
जळकोटात महामार्गाचे काम सुरू आहे. परिणामी, शहरातील जलवाहिनी काही ठिकाणी फुटली आहे. तसेच वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शहरात पाण्याची समस्या निर्माण होत आहे. शहराला माळहिप्परगा प्रकल्पातून, शहरातील दोन विहिरी आणि ढोरसांगवी साठवण तलावातून पाणीपुरवठा होतो. सध्या माळहिप्परगा प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. केवळ नियोजन नसल्याने आणि वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत.
शहरात यापूर्वी केलेली जलवाहिनी काही ठिकाणी कुचकामी ठरत आहे. नवीन जलवाहिनीसाठी सर्व्हे करण्यात यावा आणि संपूर्ण शहरात नवीन जलवाहिनी टाकण्यात यावी. माळहिप्परगा प्रकल्पानजीक एक्स्प्रेस फिडर बसून २४ तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
जलवाहिनीची दुरुस्ती सुरू...
जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येऊन शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल, असे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी उज्ज्वला शिंदे यांनी सांगितले.