चिमुकल्यांचा सुट्टी मूड कायम, अभ्यासाचा पडला विसर ।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:27+5:302021-07-11T04:15:27+5:30
पालकांनी घरातच घ्यावी शाळा... शाळा बंद असल्याने घरच चिमुकल्यांसाठी शाळा बनले आहे. पालकांनाच आता घरातच शाळा घ्यावी लागणार आहे. ...

चिमुकल्यांचा सुट्टी मूड कायम, अभ्यासाचा पडला विसर ।
पालकांनी घरातच घ्यावी शाळा...
शाळा बंद असल्याने घरच चिमुकल्यांसाठी शाळा बनले आहे. पालकांनाच आता घरातच शाळा घ्यावी लागणार आहे.
शिक्षकांचा असलेला धाक मुलांवर सध्या राहिला नाही. ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षक प्रत्यक्ष शिक्षाच करणार नाहीत, याची जाणीव झाली आहे.
गतवर्षी असलेली शाळेतील, अभ्यासातील गाेडी आता यंदा दिसून येत नाही. मुले माेठ्या प्रमाणात आळशी झाली आहेत. टीव्ही आणि माेबाइल स्क्रीनचा टाइम वाढल्याने अशा समस्या निर्माण झाल्या आहेत.
पालकांची अडचण वेगळीच...
अनेक कुटुंबात मुले अभ्यास करत नसल्याच्या तक्रारी आहेत. अभ्यासाबाबत सतत टाळाटाळ करत असल्याचे समाेर आले आहे. यातून मुले भावनिक वेठीस धरत आहेत. माेबाइलवरील गेम खळायला दिला तर अभ्यास करताे, असे सांगत आहेत. - साहेबराव निकाळले, चाकूर
माझे दाेन्ही मुले प्राथमिक शाळेत शिक्षण घेतात. मात्र, शाळाच बंद असल्याने मुलांमध्ये शाळा, अभ्यासाबाबत असलेले गांभीर्यच राहिले नाही. शाळा बंद आहे याचा अर्थ सुट्टी आहे. सुट्टी आहे म्हणजे अभ्यास करायचा नसताे, हे मुलांना वाटत आहे. मारुन सांगायचं तर तेही शक्य नाही. ऑनलाइन शिक्षणाने मुलामधील नवीन समस्या समाेर आल्या आहेत.
विष्णू कांबळे, उदगीर.
अभ्यास टाळण्यासाठी मुले सांगतात कारणे...
अभ्यास टाळण्यासाठी मुले अनेक कारणे सांगत आहेत. यातून अभ्यास करायचीच मानसिकता नाही.
माेबाइल दिले तर अभ्यास करताे, असे मुले सांगत आहेत. टीव्ही पाहिल्यानंतर अभ्यास करताे. ही कारणेही सांगत आहेत.
मारहाण केली तर आक्रमक हाेणे, शिवीगाळ करण्याचे प्रकार मुलांकडून हाेत आहेत. यातून मुलांची मानसिकता बदलत असल्याचे दिसून येत आहे.
दिवसभर घरातच काेंडून बसलेल्या मुलांच्या मानसिकतेवर परिणाम हाेत आहे. मुलांमध्ये चिडचिडपणा वाढत आहे. सतत टीव्ही, माेबाइलवर असल्याने अभ्यास नकाेसा वाटत आहे.