लहान मुलांची तब्येत बिघडली; ओपीडीमध्ये तिप्पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:25 IST2021-08-20T04:25:01+5:302021-08-20T04:25:01+5:30
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या बाल रुग्ण विभागाच्या ओपीडीमध्ये २५ टक्के वाढ झाली आहे. तसेच खाजगी बालरुग्णलयातही रुग्ण ...

लहान मुलांची तब्येत बिघडली; ओपीडीमध्ये तिप्पट वाढ
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या बाल रुग्ण विभागाच्या ओपीडीमध्ये २५ टक्के वाढ झाली आहे. तसेच खाजगी बालरुग्णलयातही रुग्ण वाढत आहेत. सर्दी, ताप,खोकला आदी लक्षणांच्या रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ झालेली आहे. सद्या जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या घटलेली आहे. दिवसाला पंधरा ते वीस रुग्ण आढळत आहेत. त्या प्रमाणात चाचण्याही केल्या जात आहेत. परंतु सर्दी,ताप, आणि खोकला अशी लक्षणे असलेल्या बाल रुग्णांत वाढ झालेली आहे. यातील बहुतांश बालरुग्णांना मिक्स इन्फेक्शन असल्याचे निदर्शनास येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
डेंग्यू-मलेरियाची चाचणी....
सर्दी,ताप,खोकला असलेल्या सर्वच बाल रुग्णांची डेंग्यू, मलेरियाची चाचणी केली जाते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चाचणी करण्यात येते सध्या शहरासह जिल्ह्यात डेंग्यूची रुग्ण आढळत आहेत.
८० टक्के मुलांची कोरोना चाचणी...
शासकीय रुग्णालयाच्या बाल रुग्ण विभागात तपासणीसाठी आलेल्या बहुतांश बाल रुग्णांची कोरोना चाचणी केली जात आहे. ज्या रुग्णाला ताप आहे, अशा रुग्णांची तर ही चाचणी केली जाते. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालय प्रशासन सतर्क आहे. ओपीडीत आलेल्या ८० टक्के मुलांची चाचणी केली जाते.
बालरोगतज्ज्ञ म्हणतात....
ताप, सर्दी, खोकला असला म्हणजे कोरोना आहे, असे नाही. परंतु सध्या मिक्स इन्फेक्शनचे बाल रुग्ण आढळत आहेत. डेंग्यू- मलेरिया, डेंग्यू-निमोनिया अशा आजाराचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे पालकांनी काळजी घ्यावी. ताप आल्यानंतर तात्काळ डॉक्टरांना दाखवून घ्यावे. भिण्याचे काही कारण नाही. डासापासून बाळांना संरक्षण मिळावे यासाठी खबरदारी घ्यावी. सध्या कोरोना चे रुग्ण नसले तरी डेंग्यू, मलेरिया आदी आजाराचे रुग्ण वाढले आहेत.
ती घ्या काळजी.....
सध्याचे आजार गुंतागुंतीचे आहेत. त्यामुळे ताप आल्यानंतर अंगावर काढू नये. डॉक्टर दाखवायला हवे. लहान मुलांना अंगभर कपडे घालून डास चावणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी.
घरात कोणाला कोरोन झाला असेल तर त्यांनी विशेष काळजी घ्यावी. लहान मुलांना दूर ठेवावे, जर ताप आला तर त्याला तात्काळ डॉक्टरांना दाखवून घ्यावे.