जन्मदात्याच्या खूनप्रकरणी मुलाला दाेन दिवसांची काेठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST2021-06-28T04:15:17+5:302021-06-28T04:15:17+5:30
पोलिसांनी सांगितले, लातूर शहरातील बाेधेनगरात राहणाऱ्या दिलीप भाऊराव कांबळे (५९) यांना काैटुंबिक वादातून एकुलत्या एक मुलाने फावडे, फरशीच्या तुकड्याने ...

जन्मदात्याच्या खूनप्रकरणी मुलाला दाेन दिवसांची काेठडी
पोलिसांनी सांगितले, लातूर शहरातील बाेधेनगरात राहणाऱ्या दिलीप भाऊराव कांबळे (५९) यांना काैटुंबिक वादातून एकुलत्या एक मुलाने फावडे, फरशीच्या तुकड्याने ताेंडावर मारून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली हाेती. या मारहाणीत दिलीप कांबळे यांचा मृत्यू झाला. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात पाेलीस कर्मचारी अशाेक चाैगुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, पाेलिसांनी आराेपी मुलगा मंगेश कांबळे (२२) याला तातडीने अटक केली. त्यास लातूर येथील न्यायालयात रविवारी हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.
फरशी, फावड्याने केली मारहाण...
बाेधेनगरातील मयत दिलीप कांबळे यांच्या डाेक्यात मुलाने फावडे घातले, शिवाय त्यांच्या चेहऱ्यावर फरशीच्या तुकड्याने जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सदरची घटना शुक्रवारी रात्री ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, याबाबत शिवाजीनगर पाेलिसांना शनिवारी सकाळी माहिती मिळाली. घटनास्थळी भेट देत पाेलिसांनी पंचनामा करून, आराेपी मुलाला अटक केली. सदरचा खून काैटुंबिक वादातून झाला असल्याचे पाेलिसांनी सांगितले.