रेल्वेस्थानकावर पाठवायला जाणे स्वस्त, प्लॅटफाॅर्म तिकिट १० रुपये, तर पार्किंग फ्री !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST2021-08-25T04:25:35+5:302021-08-25T04:25:35+5:30
पार्किंग मात्र माेफत लातूर येथील रेल्वेस्थानकात वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र शुल्क आकरले जात नाही. परिणामी, येथील पार्किंग सध्याला माेफत आहे. ...

रेल्वेस्थानकावर पाठवायला जाणे स्वस्त, प्लॅटफाॅर्म तिकिट १० रुपये, तर पार्किंग फ्री !
पार्किंग मात्र माेफत
लातूर येथील रेल्वेस्थानकात वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र शुल्क आकरले जात नाही. परिणामी, येथील पार्किंग सध्याला माेफत आहे.
यातून रेल्वे प्रवाशांना आपले वाहन येथे थांबवून रेल्वेने प्रवास करता येते. त्या तुलनेत इतर शहरात पार्किंगचे शुल्क आकारले जाते.
रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी गस्तीवर असतात. शिवाय, सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वित आहे.
स्टेशन मास्तर काेट...
लातूर रेल्वे स्थानकात सध्याला एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत. येथील साेयीसुविधांचा विचार केला तर दहा रुपये प्लॅटफार्म तिकीट खूपच कमी आहे. शिवाय, पार्किंगची व्यवस्थाही फ्री आहे. प्रवाशांची गैरसाेय हाेणार नाही. यासाठी रेल्वे विभागाकडून काळजी घेतली जात आहे. प्लॅटफार्मचे तिकीट दर जैसे थे आहेत.
- बिमलकुमार तिवारी, स्थानक प्रमुख, लातूर
प्लॅटफाॅर्म तिकिटातून रेल्वेची कमाई...
लातूर रेल्वे स्थानकावर प्रवाशासाेबत येणाऱ्या नातेवाईकांना प्लॅटफार्म तिकिटासाठी दहा रुपयांचे शुल्क आकरले जाते. यातून रेल्वे विभागाला उत्पन्न मिळते. मात्र, इतर माेठ्या रेल्वेस्थानकावर आकरण्यात येणारे शुल्क हे तिप्पट आहे. त्यातुलनेत येथील उत्पन्न अल्प आहे. सध्याला माेजक्याच एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून रेल्वे सुविधा पुरवित आहे.
प्रवाशांना पार्किंगची सुविधा...
लातूर येथील रेल्वे स्थानकावर पार्किंगची सुविधा माेफत आहे. ही सुविधा प्रवाशांना लाभदायक आहे. लातूरशहरापासून हे स्थानक दहा ते बारा किलाेमीटर अंतरावर आहे. ऑटाे आणि इतर वाहन परवडत नाही. यासाठी दुचाकी महत्वाची आहे. - गाेविंद पाटील, लातूर
मी विवेकानंद चाैक, नांदेड राेड परिसरात राहताे. रेल्वेने प्रवास करण्यासाठी मला जवळपास १५ किलाे मीटर अंतरावरील लातूर रेल्वे स्थानक गाठावे लागते. अशावेळी दुचाकीचा मी वापर करताे. रेल्वेस्थानक परिसरात दुचाकी पार्किंग करुन प्रवास करता येते. - गणपतराव तेलंगे, लातूर