शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वर्दीतील आईकडून चापटासहित चालान; सुसाट ट्रिपल सीट विद्यार्थिनींवर महिला पोलिस भडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:16 IST

तीन मुली एका दुचाकीवरून भरधाव वेगाने जात असताना चौकात तैनात असलेल्या महिला पोलिसांनी त्यांना अडवले.

लातूर : शहरातील नवीन रेणापूर नाका चौकात ट्रिपल सीटने दुचाकीवरून भरधाव जात असलेल्या तिघी विद्यार्थिनींना रविवारी वाहतूक शाखेच्या महिला पोलिस कर्मचाऱ्याने थांबवून जाब विचारत मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, त्यावर नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकारात काही नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे समर्थन केले असले, तरी "दंडात्मक कारवाई झाली असती, तर मारहाणीची गरज नव्हती" अशी टीकाही काही जणांनी केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, तीन मुली एका दुचाकीवरून भरधाव वेगाने जात असताना चौकात तैनात असलेल्या महिला पोलिसांनी त्यांना अडवले. "तुझ्या वडिलांना फोन कर, मगच गाडी घेऊन जा," असे म्हणत त्या पोलिस कर्मचाऱ्यांनी संबंधित विद्यार्थिनीला मारहाण केली व अपमानास्पद भाषाही वापरली, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. वाहतूक नियमांनुसार ट्रिपल सीटवरून जाणाऱ्यांवर दंड आकारणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्षात पोलिसांनी मारहाणीचा मार्ग स्वीकारल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत संबंधित महिला पोलिसांचे म्हणणे आहे की, "दुचाकीचा वेग अधिक होता, त्यामुळे त्या थांबवल्या नसत्या, तर अपघात होण्याची शक्यता होती." दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. 

मलाही दोन मुली आहेत, महिला पोलिसांचा संताप भरधाव वेगात जाणाऱ्या या मुलींना थांबवले असता त्या अधिक वेगाने निघून गेल्या. त्यांनी पाठलाग करून त्यांना रस्त्याच्या बाजूला गाडी घेण्यास सांगितल्याचे महिला पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी मुलींना जाब विचारात मारहाण केल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. ''भरधाव वेगात मुली ट्रिपल सीट जात होत्या. त्यांना हात दाखवला तरी थांबल्या नाहीत. अपघात झाला असता तर महागात पडले असते. मलाही दोन मुली आहेत. विनाकारण तुम्हाला बोलत नाही मी. माझ्या दोन चापटा तुम्हाला पुढच्यावेळी गाडी चालवताना लक्षात राहतील. मला चारचौघात तुम्हाला बोलायला चांगले वाटत नाही पण मागे बसलेल्या दोन्ही मुली वाकड्या बसल्या होत्या, काय गरज होती असे बसायची. हिच्यामुळे गाडीचे बॅलन्स गेले. तुम्हाला बेफाम वेगात गाडी चालवायला माफ आहे का? जीव उदार झाला आहे का? काही झाले असते तर मायबाप रडत बसले असते आयुष्यभर'', अशा शब्दात या महिला वाहतूक पोलिसांनी संताप व्यक्त केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसlaturलातूरCrime Newsगुन्हेगारी