चाकूरच्या त्या जागेच्या निर्णयाचा चेंडू जिल्हा परिषदेच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST2021-07-15T04:15:18+5:302021-07-15T04:15:18+5:30

चाकूर : चाकूर ग्रामपंचायतीचे रूपांतर १६ मार्च २०१५ रोजी नगरपंचायतीत झाले. ग्रामपंचायतीच्या मालकीतील सर्व मालमत्ता नगरपंचायतीकडे वर्ग झाली. मात्र, ...

Chakur's decision on that seat is up to the Zilla Parishad court | चाकूरच्या त्या जागेच्या निर्णयाचा चेंडू जिल्हा परिषदेच्या कोर्टात

चाकूरच्या त्या जागेच्या निर्णयाचा चेंडू जिल्हा परिषदेच्या कोर्टात

चाकूर : चाकूर ग्रामपंचायतीचे रूपांतर १६ मार्च २०१५ रोजी नगरपंचायतीत झाले. ग्रामपंचायतीच्या मालकीतील सर्व मालमत्ता नगरपंचायतीकडे वर्ग झाली. मात्र, एका जागेवर पंचायत समिती अहमदपूर असा नामोल्लेख भूमी अभिलेखच्या दप्तरी आहे. ही जागा ग्रामपंचायत क्वॉर्टर असा उल्लेख नगरपंचायतीच्या दप्तरी आहे. त्यामुळे ती जागा नगरपंचायतीला मिळणे क्रमप्राप्त आहे. दरम्यान, या जागेच्या निर्णयाचा चेंडू चाकूर पंचायत समिती चाकूर जिल्हा परिषदेच्या कोर्टात ढकलला आहे.

चाकूर ग्रामपंचायत अस्तित्वात असताना शहरातील मुख्य रस्त्यालगत सर्व्हे क्र. २११ मधील नगरपंचायत मिळकत क्रमांक १८६ मध्ये ३९७ चौ.मी. ही जागा आहे. या जागेवर एक क्वॉर्टर आहे. ग्रामपंचायत असताना तिथे धर्मार्थ एक दवाखाना सुरू होता. कालांतराने तो बंद पडला. दरम्यान, ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. तेव्हा ही जागा नगरपंचायतीला जाणे क्रमप्राप्त होते. नगरपंचायत विकास निधीतून कामे करताना ती शहराच्या उन्नतीसाठी करावीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. नगरपंचायतीच्या विकास निधीतून शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारावे. त्यातून व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी गाळे उपलब्ध होतील आणि त्या भाड्यातून नगरपंचायतीचे उत्पन्नाचे स्रोत वाढतील, म्हणून नगरपंचायतीने या खुल्या जागेत तीन मजली शॉपिंग कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव तयार केला. त्यासाठी ६० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. परंतु, भूमी-अभिलेख आखीव पत्रावर या जागेचा पंचायत समिती, अहमदपूर असा उल्लेख आहे.

चाकूर पंचायत समिती निर्माण झाल्याने अहमदपूर पंचायत समितीचा हक्क संपुष्टात आला. चाकूरला नगरपंचायत झाल्यानंतर या जागेचा हक्क नगरपंचायतीकडे येणे गरजेचे होते. परंतु, भूमी-अभिलेखच्या दरबारी अहमदपूर पंचायत समिती, असा उल्लेख असल्याने त्यात बदल करण्यासाठी नगरपंचायतीने चाकूर पंचायत समितीकडे ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी २५ मे २०२१ रोजी केली आहे.

१५ दुकाने सुरू होऊ शकतात...

पंचायत समितीने त्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २९ जून २०२१ रोजी पत्र पाठवून नगरपंचायतीने मागणी केलेल्या ना-हरकत प्रमाणपत्राचा चेंडू ढकलला आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या या जागेत कॉम्प्लेक्स बांधल्यास १५ दुकाने सुरू होऊ शकतात. जिल्हा परिषदेने नगरपंचायतीस या जागेचे ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी होत आहे.

‘ना-हरकत’ची प्रतीक्षा...

या जागेच्या नावातील बदल करण्यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्या जागेत काही दुकाने भाडेतत्त्वावर सुरू आहेत. तिथे पक्के बांधकाम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित दिले आहेत. ना-हरकत मिळाल्यास लवकरच काम सुरू होईल.

- अजिंक्य रणदिवे, मुख्याधिकारी, नगरपंचायत.

सीईओंकडे प्रस्ताव...

नगरपंचायतीने या जागेबाबत नावातील बदल करण्यासाठी पंचायत समितीला ना-हरकत प्रमाणपत्र मागितले आहे. हे पत्र देण्यासाठीचा प्रस्ताव आम्ही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविला आहे.

- वैजनाथ लोखंडे, गटविकास अधिकारी.

Web Title: Chakur's decision on that seat is up to the Zilla Parishad court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.