चाकुरात महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:07+5:302021-06-27T04:14:07+5:30
आंदोलनात माजी मंत्री विनायकराव पाटील, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जि.प.चे समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, सिद्धेश्वर पवार, नितीन रेड्डी, माजी ...

चाकुरात महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणा
आंदोलनात माजी मंत्री विनायकराव पाटील, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जि.प.चे समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, सिद्धेश्वर पवार, नितीन रेड्डी, माजी सभापती वसंत डिगोळे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव बैनगिरे, बाजार समितीचे सभापती प्रशांत पाटील, उपसभापती अशोकराव चिंते, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील-चाकूरकर, अंकुश जनवाडे, नगरसेवक ॲड. संतोष माने, रवींद्र कुलकर्णी, मेघराज बाहेती, भाजयुमोचे माजी तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर पवार, पंचायत समितीच्या सभापती जमुनाबाई बडे, उपसभापती सज्जनकुमार लोणाळे, व्यंकटराव सोनवणे, जिल्हा परिषद सदस्या धनश्री अर्जुने, प्रशांत बिबराळे, माजी सरपंच मधुकरराव मुंडे, महेश कांबळे, झरीचे सरपंच अजित खंदारे, गजानन करेवाड, बाळू कांबळे, सुरेश हाके, लता मुंडे आदी सहभागी झाले होते. यावेळी पोनि. सोपान शिरसाट यांनी बंदोबस्त ठेवला होता. आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे यांना दिले. सकाळी १०.३० वा.पासून ते दुपारी १२.३० वा. पर्यंत आंदोलन सुरू राहिल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.