उदगीरमध्ये दोन तास चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST2021-02-07T04:18:15+5:302021-02-07T04:18:15+5:30
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत ७२ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी शनिवारी ...

उदगीरमध्ये दोन तास चक्काजाम
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत ७२ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी शनिवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन तास हे आंदोलन झाल्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनावर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, शेतकरी नेते रंगा राचुरे, मंजूरखाँ पठाण, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे, अजित शिंदे, किरण पवार, अमोल कांडगिरे, रामराव बिरादार, विनोद सुडे, विजयकुमार चवळे, ईश्वर समगे, सद्दाम बागवान, बालिका मुळे, अविनाश गायकवाड, नंदकुमार पटणे, ज्ञानेश्वर पाटील, श्रीनिवास एकुर्केकर, शेख महेबूब, धनाजी मुळे, दत्ता काकडे आदींच्या सह्या आहेत.
शेतकरी विरोधी कायदे मागे घ्या...
मागील ७२ दिवसांपासून देशातील शेतकरी गाजीपूर सीमा, टिकरी सीमा, सिंधू सीमेवर केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकार त्याची दखल न घेता बॅरिकेड उभे करून, रस्ते खोदून, भिंती बांधून व काटेरी तारांचे कुंपण करून शेतकऱ्यांना कैद्याप्रमाणे वागणूक देत आहेत. केंद्र सरकारच्या या आडमुठ्या धोरणाचा महाराष्ट्रातील शेतकरी तीव्र निषेध करीत आहेत. वाढती महागाई, वाढलेले इंधनाचे दर, वाढती बेरोजगारी या बाबीवर शासनाने गांभीर्याने विचार करून सामान्य जनतेस दिलासा द्यावा. तसेच मंजूर केलेले तिन्ही शेतकरी विरोधी कायदे त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.