निलंग्यात तीन तास चक्काजाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:21+5:302021-06-27T04:14:21+5:30
निलंगा : ओबीसी आरक्षणासाठी भाजपच्यावतीने निलंग्यात शनिवारी तीन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. भाजप प्रदेश सचिव अरविंद पाटील-निलंगेकर यांच्या ...

निलंग्यात तीन तास चक्काजाम आंदोलन
निलंगा : ओबीसी आरक्षणासाठी भाजपच्यावतीने निलंग्यात शनिवारी तीन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. भाजप प्रदेश सचिव अरविंद पाटील-निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
यावेळी अरविंद पाटील-निलंगेकर म्हणाले, ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द होण्यास राज्य शासन कारणीभूत आहे. राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसी समाज अस्वस्थ झाला असून, त्यांचे हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. महाविकास आघाडी सरकारला मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडता आली नाही, हे सरकारचे अपयश आहे. आरक्षण मिळेपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही.
शनिवारी सकाळी ११ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीन तास आंदोलन झाले. त्यानंतर तहसीलदार गणेश जाधव यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. या आंदोलनात जिल्हा परिषद उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके, भाजप तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे, दगडू सोळुंके, सभापती राधा बिराजदार, संजय दोरवे, तानाजी बिरादार, शरद पेठकर, शेषराव ममाळे, वीरभद्र स्वामी, संतोष वाघमारे, किशोर लंगोटे, ज्ञानेश्वर बरमदे, तुकाराम साळुंके, प्रणिता केदारे, ऋतुजा पोतदार, तुकाराम माळी, गुंडेराव जाधव, सुमित इनानी, वैभव पाटील, आदी सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे लातूर - बिदर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.