ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्यभर चक्का जाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST2021-06-22T04:14:24+5:302021-06-22T04:14:24+5:30

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने समाजातील ५६ हजार व्यक्तींना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत स्थानिक ...

Chakka Jam agitation across the state for political reservation of OBCs | ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्यभर चक्का जाम आंदोलन

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्यभर चक्का जाम आंदोलन

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने समाजातील ५६ हजार व्यक्तींना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी आमची मागणी असल्याचेही ते म्हणाले.

मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार असंवेदनशील आहे. एससी, एसटी प्रवर्गातील पदोन्नतीतील आरक्षण या सरकारने रद्द केले आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत फेरयाचिका दाखल सरकारने केली नाही. त्यामुळे सर्वच समाज घटक या सरकारवर नाराज आहेत, असेही टिळेकर म्हणाले.

पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आ. गोविंद केंद्रे, माजी आ. बब्रुवान खंदाडे, जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, गणेश हाके, बापू राठोड, स्वाती जाधव, आदींची उपस्थिती होती.

Web Title: Chakka Jam agitation across the state for political reservation of OBCs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.