विधि अभ्यासक्रमासाठी सीईटी प्रवेश परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:21 IST2021-07-28T04:21:10+5:302021-07-28T04:21:10+5:30

तंत्रनिकेतनमध्ये सायली सूर्यवंशीचे यश लातूर : पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये डिप्लोमा इन इंजिनिअरिंग परीक्षेत सायली गोविंद सूर्यवंशी या विद्यार्थिनीने ...

CET entrance exam for law course | विधि अभ्यासक्रमासाठी सीईटी प्रवेश परीक्षा

विधि अभ्यासक्रमासाठी सीईटी प्रवेश परीक्षा

तंत्रनिकेतनमध्ये सायली सूर्यवंशीचे यश

लातूर : पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये डिप्लोमा इन इंजिनिअरिंग परीक्षेत सायली गोविंद सूर्यवंशी या विद्यार्थिनीने इलेक्ट्रॉनिक शाखेत ८९.७९ टक्के गुण घेऊन यश मिळविले आहे. तिच्या या यशाचे कौतुक प्राचार्य डॉ. के.एम. बकवाड यांनी केले आहे.

काळ्या फिती लावून आंदोलन

लातूर : खासगी संस्थांतील माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षकांना अद्याप सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता अद्याप देण्यात आला नाही. तसेच पेन्शन योजनाही लागू करण्यात आली नाही. ती लागू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी २८ व २९ रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने काळ्या फिती लावून आंदोलन केले जाणार आहे. शिक्षक काळ्या फिती लावून कामकाज करून प्रशासनाचा निषेध नोंदविणार आहेत. यात सहभागी व्हावे, असे आवाहन विजयसिंह मोरे, ज्ञानेश्वर गवरे, राहुल रोकडे, तुळशीदास धडे, अरविंद पुलगुर्ले, तानाजी सोमवंशी यांनी केले आहे.

Web Title: CET entrance exam for law course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.