देवणी तालुक्यातील दिव्यांगांचा सन्मान सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:18 IST2021-02-15T04:18:21+5:302021-02-15T04:18:21+5:30
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, भगवानराव पाटील तळेगावकर यांच्या हस्ते डेमो हाऊसचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती ...

देवणी तालुक्यातील दिव्यांगांचा सन्मान सोहळा
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, भगवानराव पाटील तळेगावकर यांच्या हस्ते डेमो हाऊसचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती शंकरराव पाटील होते तर पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्ष भारतबाई साळुंखे, जि.प. समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, कृषी सभापती गोविंद चिलकुरे, जि.प. सदस्य रामचंद्र तिरुके, पृथ्वीराज शिवशिवे, प्रशांत पाटील, भगवानराव पाटील तळेगावकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बालाजी बिरादार, तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, सहायक गटविकास अधिकारी अच्युत पाटील, गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव बोईनवाड, पंचायत समितीचे सदस्य सत्यवान कांबळे, चित्रकला बिरादार, सविता पाटील, शीलाताई सज्जन शेट्टे, सोमनाथ बोरुळे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ आष्टुरे, हावगीराव पाटील, काशीनाथ गरिबे, अटल धनुरे, ओम धनुरे, लोहारे आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात प्राथमिक स्वरूपात देवणी तालुक्यातील ३५ दिव्यांगांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
३१० लाभार्थ्यांना मिळणार लाभ...
देवणी तालुक्यातील ३१० लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. यात तीनचाकी सायकल, चार्जिंग मोटारसायकल, अंधकाठी, अंधांसाठी स्मार्टफोन, श्रवणयंत्र, कुबड्या, साधी काठी अशा साहित्याचे वाटप त्या त्या लाभार्थ्यांना केले जाणार आहे. त्यासाठी त्या लाभार्थ्याला शिबिरात दिलेली पावती दाखविणे बंधनकारक असल्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सांगितले. सूत्रसंचालन राजकुमार जाधव यांनी तर आभार पृथ्वीराज शिवशिवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवणी पंचायत समितीचे पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.