किल्लारीत वट पौर्णिमा उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST2021-06-25T04:15:31+5:302021-06-25T04:15:31+5:30
किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी व परिसरातील गावांमध्ये वट पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. सात जन्मी हाच पती ...

किल्लारीत वट पौर्णिमा उत्साहात साजरी
किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी व परिसरातील गावांमध्ये वट पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. सात जन्मी हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना महिलांनी वडाचे पूजन करून केली.
वट पौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व
वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो.
वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे महत्त्व
वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्त लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायूमंडलात प्रक्षेपित करतात. ज्यावेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते, त्यावेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात.