आयएमएच्या वतीने जागतिक अवयवदान दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:25 IST2021-08-18T04:25:45+5:302021-08-18T04:25:45+5:30
अध्यक्षस्थानी अधीक्षक डॉ. संतोष डोपे होते. यावेळी आयएमएच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे यांनी अवयवदानाचे महत्त्व सांगितले. लातूर येथील त्वचारोगतज्ज्ञ ...

आयएमएच्या वतीने जागतिक अवयवदान दिन साजरा
अध्यक्षस्थानी अधीक्षक डॉ. संतोष डोपे होते. यावेळी आयएमएच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे यांनी अवयवदानाचे महत्त्व सांगितले.
लातूर येथील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अजय ओहोळ यांनी त्वचादानाचे महत्त्व सांगितले, तर डॉ. शिवाजी काळगे यांनी नेत्रदानाबद्दल, डॉ. ओमप्रकाश भोसले यांनी हृदयदान, डॉ. विद्यासागर बाहेती यांनी किडनीदानाबद्दल मार्गदर्शन केले. आयएमए सचिव डॉ. हनुमंत किनीकर यांनी आभार मानले.
सूत्रसंचालन डॉ. विमल डोळे यांनी केले. कार्यक्रमास डॉ. शोभा निसाले, डॉ. नीलिमा देशपांडे, डॉ. श्वेता काटकर, डॉ. सुवर्णा कोरे, डॉ. रामेश्वरी अलाहाबादे, डॉ. परमेश्वर सूर्यवंशी, डॉ. शैलेश चव्हाण, डॉ. मोहिनी गानू, डॉ. राजश्री सावंत, डॉ. दीपा पुरी, डॉ. केतकी चवंडा, डॉ. स्वामी, डॉ. किरण होळीकर, डॉ. अपूर्वा चेपुरे, मस्के आदींसह डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.