सावधान, लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण; मास्क नियमित वापरण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST2021-08-14T04:24:53+5:302021-08-14T04:24:53+5:30
लसीकरणाबरोबर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमित मास्क वापरणे काळाची गरज बनली आहे. त्याचबरोबर सुरक्षित अंतर आणि वारंवार हात धुणे या ...

सावधान, लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण; मास्क नियमित वापरण्याची गरज
लसीकरणाबरोबर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमित मास्क वापरणे काळाची गरज बनली आहे. त्याचबरोबर सुरक्षित अंतर आणि वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा वापर करणे गरजेचे आहे. १५८ रुग्णांपैकी लस घेतल्यानंतर ३१ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यातील ११ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. तर २० जणांचा पहिला डोस झाला आहे. यावरून नियमित मास्क वापरणे अत्यावश्यक झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८ लाख ४ हजार ७५३ डोस दिले आहेत. त्यापैकी ६ लाख ७ हजार ८३० जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या १ लाख ९६ हजार ९२३ इतकी आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे २० लाखांचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार आतापर्यंत २८ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. लसीचा मागणी तसा पुरवठा होत नसल्यामुळे उद्दिष्ट साध्य करण्यास विलंब होत आहे.