मांजरा परिवार ५ मे. टन क्षमतेचा ऑक्सिजन प्रकल्प उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST2021-05-27T04:21:20+5:302021-05-27T04:21:20+5:30
यावेळी जिल्हा बॅंकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, मांजराचे व्हा.चेअरमन श्रीशैल उटगे, जागृतीचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा.चेअरमन ...

मांजरा परिवार ५ मे. टन क्षमतेचा ऑक्सिजन प्रकल्प उभारणार
यावेळी जिल्हा बॅंकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, मांजराचे व्हा.चेअरमन श्रीशैल उटगे, जागृतीचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा.चेअरमन अनंतराव देशमुख, ट्वेन्टीवन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, जिल्हा बॅंकेचे व्हा. चेअरमन पृथ्वीराज सिरसाट, रेणाचे संचालक संग्राम माटेकर, लालासाहेब चव्हाण, संभाजी रेड्डी, अनिल कुटवाड, सचिन दाताळ, गोंविद बोराडे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे आदींची उपस्थिती होती.
एक महिन्यात प्रकल्पातील पहिला टप्पा कार्यान्वित...
ऑक्सिजन प्रकल्पामध्ये वातावरणातून येत असलेली धूळ, ऑइल, दव स्वरूपातील पाणी, विषाणू किंवा जीवाणू वेगळे करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे उत्तम प्रतीचा ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध केला जाणार आहे. यामुळे आजारातून बाहेर पडलेल्या रुग्णांस अन्य आजाराच्या प्रादुर्भावापासून दूर राहण्यास मदत होणार आहे. दोन टप्प्यांत प्रकल्पाचे काम होणार असून, पहिला टप्पा एका महिन्यात पूर्ण होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.