अतिवृष्टी झाली तर सखल भागांना धाेका, पावसाळ्यात या ठिकाणी न गेलेलेच बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST2021-07-29T04:21:08+5:302021-07-29T04:21:08+5:30

लातूर शहरातील पाणी साचणारी ठिकाणे... पावसाळ्याच्या दिवसात गावभागात माेठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. शिवाय, आनंदनगर, जयनगर, राजीवनगर, काेल्हे नगर, ...

In case of heavy rains, it is better not to visit this place during monsoon | अतिवृष्टी झाली तर सखल भागांना धाेका, पावसाळ्यात या ठिकाणी न गेलेलेच बरे

अतिवृष्टी झाली तर सखल भागांना धाेका, पावसाळ्यात या ठिकाणी न गेलेलेच बरे

लातूर शहरातील पाणी साचणारी ठिकाणे...

पावसाळ्याच्या दिवसात गावभागात माेठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. शिवाय, आनंदनगर, जयनगर, राजीवनगर, काेल्हे नगर, म्हाडा काॅलनी परिसर, मळवटी राेड परिसर, जुना औसा राेड परिसर, बरकतनगर, भीमनगर, बाैध्दनगर भागातील काही रस्त्यावर पाणी साचत असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त हाेत आहे. या भागातील गटारी पावसाळ्यापूर्वी साफ करण्याची माेहीम हाती घेण्याची गरज आहे.

महापालिकेचे तेच ते रडगाणे...

लातूर शहर महानगरपालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करत असल्याचा दावा करत आहे. तरीही शहरातील सखल भागात पावसाचे पाणी का साचत आहे, हे मात्र काेडे सुटत नाही. दरवर्षी थाेडासाही पाऊस झाला तरी शहरातील काही नगरामध्ये रस्त्यावरूनच पाणी वाहत असते. दरम्यान, काही ठिकाणी तलावासारखे दृश्य दिसून येत आहे. ही परिस्थिती दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात उद‌्भवत आहे.

पाणी साचण्याची कारणे...

१ लातूर शहरात पाणी साचण्याची प्रमुख कारणे सखल भाग आहे. याच भागात पाणी साचते, हा अनुभव आहे.

२ पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची माेहीम हाती घेण्याची गरज आहे. मात्र, ती प्रभावीपणे राबविली जात नसल्याने पाणी साचत आहे.

३ पाण्याचा निचरा याेग्य करण्यात न आल्याने माेठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी रस्त्यावरूनच वाहते.

४ पावसळ्यात पाऊस झाल्यानंतर गटारीतून वाहणारे पाणी बाहेर पडते आणि ते पाणी परिसरातील रस्त्यावर ठिकठिकाणी साचते.

पाउस नकाे नकाे सा...

पावसाळ्यात थाेडासाही पाउस झाला तरी, आमच्या भागात पाणी साचते. या भागातील रस्त्यांची काम व्यवस्थित झाली नाहीत. शिवाय, गटारींचीही कामेही अद्याप व्यवस्थित झाली नाहीत. त्याचबराेबर महानगर पालिकेच्यावतीने गटारींची स्वच्छता वेळेवर करण्यात येत नसल्याने पावसाळ्यात या गटारी तुंबतात. यातून सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसून येत आहे.

- बाबुराव गायकवाड, लातूर

पावसाळ्याचे दिवस असल्याने सखल भागात, झाेपडपट्टी परिसरात पावसाचे पाणी साचत आहे. जयनगर, राजीवनगर झाेपडपट्टीत अद्यापही रस्ते, गटारी आणि इतर सुविधांचा अभाव आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. परिणामी, पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावर चिखल आणि त्यातच पावसाचे पाणी ठिकठिकाणी थांबत असल्याने नागरिकांची गैरसाेय हाेत आहे.

- पवन जाधव, लातूर

Web Title: In case of heavy rains, it is better not to visit this place during monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.