काेराेनाचा कहर सुरूच... सिटी स्कॅनचे प्रमाण वाढले।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:19 IST2021-04-11T04:19:41+5:302021-04-11T04:19:41+5:30
लातूर जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये अनेकांनी आजार अंगावर काढल्याने, गंभीरपणे न घेतल्याने, खूप दिवस ...

काेराेनाचा कहर सुरूच... सिटी स्कॅनचे प्रमाण वाढले।
लातूर जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये अनेकांनी आजार अंगावर काढल्याने, गंभीरपणे न घेतल्याने, खूप दिवस खाेकला, ताप राहिल्याने स्काेरचे प्रमाण वाढले आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात १० ते १५ च्याआत स्काेर येणाऱ्या रुग्णांचा टक्का ५ च्या आत रुग्ण हाेते. सध्याला त्यात माेठी वाढ झाली आहे. तपासणी करण्यात आलेल्या रुग्णापैकी शून्य स्काेर असलेल्या रुग्णांची टक्केवारी १० आहे. १९ ते २५ स्काेअर असलेल्या रुग्णांची टक्केवारी १५ आहे. ५ ते १८ स्काेर असलेल्या रुग्ण ४० टक्क्यांवर आहे. आणि साैम्य अर्थात १ ते ५ स्काेर असलेल्या रुग्णांची टक्केवारी ५० टक्के आहे. १९ ते २५ स्काेर असणाऱ्या रुग्णांत ग्रामीण भाग आघाडीवर आहे. लातूर शहरातील जवळपास सर्वच सिटी स्कॅन सेंटरवर शासकीय दरानेच सिटी स्कॅन केले जात आहे. या सेंटरवर प्रशासनाची करडी नजर आहे.
महिनाभरात वाढले एचआरसीटीचे प्रमाण...
लातूर शहरात असलेल्या सिटी स्कॅन सेंटरवर एचआरसीटी हाेण्याचे प्रमाण पूर्वी नगण्य हाेते. आता महिनाभरापासून हे प्रमाण खूप वाढले आहे. यामध्ये न्युमोनिया आजाराचे निदान करून छातीत झालेल्या इन्फेक्शनवरून काेराेनाचेही प्रमाण ठरविण्यात येत. त्यातून तपासणीचे प्रमाणही वाढले आहे.
लातूर शहर आणि जिल्हाभरात जवळपास दहा सिटी स्कॅन सेंटरची संख्या आहे. आम्ही शासन आणि इंडियन रेडिओलाॅजी असाेसिएशनच्या वतीने ठरवून दिलेल्या दरातच रुग्णांचे सिटी स्कॅन करताे. या सेंटरकडून शासकीय नियमांचे नियमित पालन केले जाते. दरदिनची आकडेवारी आणि माहिती वेबसाइटवर अपलाेड केली जाते. १६ स्लाइड खालील सिटी स्कॅनला आम्ही ४ हजार आणि १६ ते ६४ स्लाइडच्या सिटी स्कॅनला ४ हजार आणि ६४ पेक्षा अधिक स्लाइडला ५ हजारांचा दर आकरला जाताे. ताे ठरवून दिलेल्या नियमानुसार आहे. ३० ते ४० टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. खूप दिवस अंगावर आजार काढणे, चालढकलपणा करणे, प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष करणे, हेच रुग्ण आणि नातेवाइकांच्या अंगलट येते. पूर्वी दाेन चार रुग्णांचा स्काेर २० पर्यंत असल्याचे आढळून येत असत. आता मात्र, गत काही दिवसांपासून १५ ते २० च्या दरम्यान स्काेर असलेल्या रुगणांची संख्याही झपाट्याने वाढल्याचे समाेर आले आहे.
- डाॅ. अतुल देशमुख, रेडिओलाॅजिस्ट, लातूर
सिटी स्कॅनद्वारे एचआरसीटी करण्यात आले. मात्र, चाचणीत रिपाेर्ट पॉझिटिव्ह आला. तातडीने रुग्णालयात दाखल केले. १२ दिवसांनंतर अहवाल निगेटिव्ह आला. वेळीच निदान आणि उपचार करता आले. दुर्लक्ष न करता तातडीने तपासणी करून घेण्याची गरज आहे.
- विजय जाधव, नातेवाईक
सिटी स्कॅनला अधिकचे पैसे घेतले जात नाहीत. मात्र, रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी नातेवाइकांना धावपळ करावी लागते आहे. एचआरसीटी रिपार्ट पाहून नियाेजन करायला हवे, त्यातून रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा मिळेल.
- विकास उदगीरकर, नातेवाईक