राजकुमार जाेंधळे, औसा (जि. लातूर) : चाेरट्या मार्गाने कारमधून गुटख्याची वाहतूक करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा आणि औसा येथील पाेलिस पथकांनी पकडले असून, त्याच्याकडून कारसह गुटखा असा एकूण १२ लाख ५४ हजार ७०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत औसा पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, महाराष्ट्रात बंदी असलेला पान मसाला, सुगंधी जर्दा आणि तंबाखूचे ३ हजार ३०० पुडे विक्रीसाठी चाेरट्या मार्गाने कारमधून (एम.एच. १२ एस.एल. ५१६०) वाहतूक करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेसह औसा येथील ठाण्याच्या पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे मंगळवारी ४ वाजण्याच्या सुमारास सापळा रचला.
दरम्यान, पाेलिसांनी संशयीत कारचा सिनेस्टाईल पाठलाग करत कारसह एकूण १२ लाख ५४ हजार ७०४ रुपायांचा गुटखा जप्त केला. यावेळी एकाला पाेलिसांनी मुद्देमालासह पकडले. याबाबत आसिफ महेबूब सय्यद (वय ३८, रा. हाश्मी नगर, औसा) याच्याविराेधात औसा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राहुल कांबळे, रियाज सौदागर, अर्जुन राजपूत, नितीन कटारे, सुनील कोव्हाळे, बालाजी चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.