शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त कारनं पेट घेतला; सहा जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 15:09 IST

रात्री अपघात झालेल्या कारने सकाळी पेट घेतला

लातूर : जिल्ह्यातील लातूर - नांदेड महामार्गावरील भातखेडा गावाजवळ दोन कारचा अपघात झाला. सोमवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान अपघातातील एका कारने मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामध्ये ही कार जळून खाक झाली. या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ दत्ता पांचाळ (40) हे आपल्या कुटुंबासह पुण्याहून लातूर जिल्ह्यातील धामणगावकडे कारने (एम.एच. 17 व्ही. 3580) सोमवारी रात्री निघाले होते. त्यावेळी चाकूरहून लातूरकडे निघालेल्या भरधाव कारने (एम.एच. 14 एएम. 2549) पांचाळ यांच्या कारला जोरदार धडक दिली. सोमवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये सहा जण जखमी झाले असून, त्यांच्यावर लातूरच्या शासकीय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोडवे यांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात