कासारसिरसी ते लातूर बस सेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST2021-08-18T04:26:03+5:302021-08-18T04:26:03+5:30
लातूर येथे आकाशवाणी केंद्र मंजूर करा अहमदपूर : लातूर येथे आकाशवाणीचे नव्याने स्वतंत्र केंद्र मंजूर करावे, अशी मागणी मराठवाडा ...

कासारसिरसी ते लातूर बस सेवा सुरू
लातूर येथे आकाशवाणी केंद्र मंजूर करा
अहमदपूर : लातूर येथे आकाशवाणीचे नव्याने स्वतंत्र केंद्र मंजूर करावे, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेचे तालुका सचिव डाॅ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी दिल्ली येथे प्रधानमंत्री कार्यालयाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. लातूर येथे आकाशवाणी केंद्र मंजूर व्हावे ही येथील जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. खास बाब म्हणून लातूर येथे आकाशवाणी केंद्र मंजूर करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
समर्थ विद्यालयात वृक्षारोपण उपक्रम
उदगीर : तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सिद्धार्थ बोडके, प्रा. एम.व्ही. स्वामी, प्रा. वीरभद्र तोडकर, प्रा. एन.आर. लांजे, प्रा. बी.एस. बाबळसुरे, बी.एन. खंदाडे, बी.जी. कानपूर्णे, प्रा. शशिकांत जाधव, के.डी. मुडपे, एन.टी. राठोड, पी.जी. बेंबडे, संजय जाधव, किरण हाळीघोंगडे, नीलेश जाधव, सुनील बेरळीकर, प्रदीप केंद्रे, अमर जाधव, प्रा. सचिन वळसणे, निजलिंग मठवाले, संदीप जाधव, शिवाजी राठोड आदींसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
अंधोरीत हरणांकडून शेतीपिकांचे नुकसान
अंधोरी : अहमदपूर तालुक्यातील अंधोरी उत्तरेकडील माळरान शिवारात असणारी हरणांच्या कळपांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. हरणांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने वन विभागाकडे करण्यात आली आहेे. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. हरणांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
मंगेशकर महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा
औराद शहाजानी : येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. शारदोपासक शिक्षण संस्थेचे संचालक तथा माजी प्राचार्य शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.अनंत गोदरे यांनी केले. प्रा.अनंत गोदरे, प्रा. दुर्गादास सबनीस, धनश्री पिंगाने यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथराव वलांडे, सचिव रमेश बगदुरे, बस्वराज वलांडे, किशनरेड्डी भिंगोले, अनिल डोईजोडे, दगडू गिरबने, मडोळय्या मठपती, प्राचार्य डॉ. अजितसिंह गहेरवार, विरूपाक्षय्या शंकद, आलिया चौधरी आदींसह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.