शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

Video: बुलेटस्वारांचा 'फटाका' बंद; पोलिसांनी ५ लाखांच्या सायलेन्सरवर फिरवला राेलर!

By राजकुमार जोंधळे | Updated: April 12, 2023 19:00 IST

लातुरात कारवाईचा बडगा : हाैसी वाहनधारकांना पाेलिसांनी दिला दणका...

लातूर : शहरासह जिल्ह्यात फटाका सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांवर पाेलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून, कर्णकर्कश आवाज करीत सुसाट धावणाऱ्या वाहनधारकांना लगाम लावण्यासाठी लातूर पाेलिसांनी विशेष माेहीम हाती घेतली आहे. लातुरात कारवाई करण्यात आलेल्या जवळपास ५०० वाहनांचे सायलेन्सर पाेलिसांनी जप्त केले. संबंधित वाहनधारकांविराेधात दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या पाच लाखांच्या फटाका सायलेन्सरवर पाेलिसांनी थेट राेलर फिरवत ते नष्ट केले.

पाेलिसांकडून वारंवार सूचना देण्यात येऊनही काही हाैसी वाहनधारकांकडून फटाका, कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर वापरले जात आहेत. याबाबत लातूर शहर वाहतूक शाखा आणि विविध पाेलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईनंतरही काही वाहनधारक मूळ सायलेन्सर वापरत नसल्याचे दिसून आले. अखेर गत महिनाभरात लातूर पाेलिसांनी विविध मार्गांवर वाहन तपासणी करून फटाका (माॅडिफाय) सायलेन्सर जप्त केले. या जप्त केलेल्या सायलेन्सरबराेबरच त्या-त्या वाहनधारकांना हजाराे रुपयांचा दंडही करण्यात आला. काहींवर थेट न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला आहे.

लातूर पाेलिसांची धडक माेहीम सुरू...सण-उत्सव काळात काढण्यात येणाऱ्या दुचाकी रॅलीत अशा फटाका सायलेन्सर असलेल्या दुचाकींचा माेठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचे आढळून आले आहे. पाेलिस अशांवर तातडीने कारवाई करीत आहेत. मात्र, काही वाहनधारक पाेलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पाेलिसांनी आता धडक माेहीम हाेती घेतली आहे. महिनाभरात तब्बल ५०० पेक्षा अधिक सायलेन्सर जप्त केले आहेत.

५ लाखांचे सायलेन्सरपाेलिसांनी केले नष्ट...लातूर पाेलिसांनी जप्त केलेल्या तब्बल पाच लाखांच्या फटाका सायलेन्सरवर साेमवारी राेलर फिरवत ते नष्ट केले. डांबरी रस्त्यावर एका ओळीत सायलेन्सर ठेवून त्यावरून राेलर फिरविण्याची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडीओ लातूर पाेलिसांच्या ट्विटरवर अपलाेड करण्यात आला आहे. या कारवाईने फटाका सायलेन्सर वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

खबरदार! फटाका सायलेन्सर वापराल तर...मिरवणूक, दुचाकी रॅलीसह लातुरात फटाका सायलेन्सर वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यांना जवळपास तीन लाखांवर दंड करण्यात आला आहे. दंड नाही भरला तर त्यांच्याविराेधात थेट न्यायालयातून नाेटीस काढली जाते. फटाका सायलेन्सर वापराल तर खबरदार... थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असे पाेलिसांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिसlaturलातूर