स्वतःमधील गुणवत्ता ओळखून प्रभुत्व निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST2021-07-07T04:24:52+5:302021-07-07T04:24:52+5:30
श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था अंतर्गत विविध विद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन राजा नारायणलाल लाहोटी ...

स्वतःमधील गुणवत्ता ओळखून प्रभुत्व निर्माण करा
श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था अंतर्गत विविध विद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये करण्यात आले होते. समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, प्राचार्य कर्नल एस. ए. वरदन, संस्था सहसचिव शरदकुमार नावंदर यांची प्रमुख उपस्थिती होती. तीन दिवसीय कार्यशाळेत वेळेचे आदर्श व्यवस्थापन, आदर्श नेतृत्व कौशल्य व निकष, मूल्यवर्धन व व्यक्तिमत्त्व विकास, भविष्यकालीन प्रकल्प योजना, ध्येय या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. साधनव्यक्ती म्हणून मुख्याध्यापिका विद्या साळवे, उपप्राचार्य विक्रम माने, कुलसचिव प्रवीण शिवणगीकर यांनी प्रशिक्षण दिले. गीतांजली शिंदे, सरिता खंडेलवाल, देवयानी देशपांडे यांनी सहायक साधनव्यक्ती म्हणून काम पाहिले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महेशकुमार, आशिद बनसोडे, विवेक डोंगरे, मिलिंद शेटे, अकमल काझी यांनी अधिक परिश्रम घेतले़