वाहन चालविताना नियम मोडला; दंडाचाही विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:14 IST2021-07-08T04:14:34+5:302021-07-08T04:14:34+5:30

लातूर : शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गांवर वाहतुकीचे नियम मोडून सुसाट धावणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ई-चालन ...

Broke the rules while driving; Forget the penalty too! | वाहन चालविताना नियम मोडला; दंडाचाही विसर!

वाहन चालविताना नियम मोडला; दंडाचाही विसर!

लातूर : शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गांवर वाहतुकीचे नियम मोडून सुसाट धावणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ई-चालन पद्धतीने करण्यात आलेल्या कारवाईबाबत अनेक वाहनधारक अद्यापि अनभिज्ञ आहेत. परिणामी, शेकडो वाहनधारकांकडे दंडाची रक्कम अद्यापही थकीत आहे.

लातूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील वेगवेगळ्या चौकात वाहन तपासणी करून नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. जानेवारी ते जून २०२१ दरम्यान ट्रिपल सीट ३९०६, विनामास्क ३३ हजार १०२, विना हेल्मेट १८८, नो-पार्किंग ५०६, मोबाइलवर बोलणे १३७६, फॅन्सी नंबर प्लेट २४९ आणि विना लायसन वाहन चालविणाऱ्या ३९०६ वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

वेगावर हवे नियंत्रण, सर्वाधिक दंड सुसाट वाहनांवर

लातूर शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गांवर सुसाट धावणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वर्षभरात सर्वाधिक दंड भरधाव वाहनधारकांना करण्यात आला आहे.

नियम मोडण्याबरोबर चुकीच्या दिशेने वाहन चालविणाऱ्यांचाही समावेश कारवाईत आहे. यामध्ये विना लायसनधारकांची संख्या जास्त आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट सक्तीचे करण्यात आले असतानाही ते वापरले जात नसल्याचे आढळून आले आहे. अशा १८८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

लवकर दंड न भरल्यास

ई चालन पद्धत अंमलात येण्यापूर्वी जाग्यावरच दंड भरण्याची आणि पावतीची सुविधा देण्यात आली होती. यामध्ये अनेकदा पावती न देता पैसे आकारले जात असल्याचे समोर आले होते.

आता ई चालन पद्धत अस्तित्वात आली आहे. परिणामी, पेपरलेस कामकाजाबरोबरच कारवाई करणे पोलिसांना अधिक सुलभ झाले आहे.

ई चालन वेळेवर नाही भरल्यास एखाद्या मोहिमेत अचानक वाहन तपासणी झाली आणि दंडाची रक्कम पाहून त्यांच्यावर जप्तीची कारवाई होऊ शकते.

Web Title: Broke the rules while driving; Forget the penalty too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.