घराचे कुलूप तोडून दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST2021-06-09T04:24:36+5:302021-06-09T04:24:36+5:30
अहमदपूर शहरातील लेक्चर कॉलनीमध्ये माधव नागनाथ भोजराज यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील मोतीहार किंमत चार ...

घराचे कुलूप तोडून दागिन्यांची चोरी
अहमदपूर शहरातील लेक्चर कॉलनीमध्ये माधव नागनाथ भोजराज यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील मोतीहार किंमत चार हजार रुपये तसेच एक ग्राम सोन्याचे मनी, टायटन घड्याळ, तीन ग्रॅम वजन वजनाचे पदक, चांदीचे दोन शिक्के, चांदीचे चैन, वाळे असे एकूण ३७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरला. याबाबत माधव भोजराज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ४५४,४५७,३८० भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाँ बेंबडे करीत आहेत.
शेतातील रस्त्यात कच टाकण्यावरून दोघांना महान
लातूर : शेतातील रस्त्यात कच, झेरी टाकण्याच्या कारणावरून हाळी शिवारात दोघांना मारहाण झाल्याची घटना ७ जून रोजी घडली. याबाबत वाढवणा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी तानाजी बाळासाहेब माने (रा. हळी, ता. उदगीर) यांना व त्यांच्या वडिलांना शेतातील रोडजवळील रस्त्याला कच तसेच झेरी टाकण्याच्या कारणावरून गावातीलच सतीश मोहन माने व अन्य तिघांनी काठीने मारून जखमी केले. या मारहाणीत फिर्यादीचा हात फॅक्चर झाला असून, फिर्यादीच्या आईला डोक्यात, पाटीत, हातावर मारहाण करण्यात आली आहे. फिर्यादीचे वडीलही जखमी झाले आहेत. याबाबत तानाजी बाळासाहेब माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाढवणा पोलीस ठाण्यात सतीश मोहन माने व अन्य तिघांविरुद्ध कलम ३२५, ३२४, ५०४,५०६,३४ भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. मुरुडकर करीत आहेत.