दोन्ही लसी परिणामकारक; पसंती मात्र कोविशिल्डलाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST2021-06-22T04:14:36+5:302021-06-22T04:14:36+5:30
सद्य:स्थितीत कोव्हॅक्सिनचा पुरवठा मर्यादित असल्याने दुसरा डोस दिला जात आहे तर कोविशिल्डचा पुरवठा असल्याने दोन्हीही डोस दिले जात आहेत. ...

दोन्ही लसी परिणामकारक; पसंती मात्र कोविशिल्डलाच !
सद्य:स्थितीत कोव्हॅक्सिनचा पुरवठा मर्यादित असल्याने दुसरा डोस दिला जात आहे तर कोविशिल्डचा पुरवठा असल्याने दोन्हीही डोस दिले जात आहेत. कोविशिल्डचे आतापर्यंत ३ लाख ७६ हजार २७६ डोस दिले आहेत. तर कोव्हॅक्सिनचे ८३ हजार ३१ डोस देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्हीही लसी परिणामकारक आहेत. लस उपलब्धतेनुसार डोसचे नियोजन केले जात आहे. दैनंदिन नियोजनानुसार लसीकरण केंद्रांवर लाभार्थ्यांना पहिला आणि दुसरा डोस दिला जात आहे. सध्या कोविशिल्डचे दोन्हीही डोस उपलब्ध आहेत. - डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्याधिकारी
लस उपलब्धतेनुसार नियोजन
दोन्हीही लसची परिणामकारकता आहे. जी उपलब्ध आहे, ती लस देण्याला प्राधान्य आहे.
पहिला डोस ज्या लसीचा घेतला आहे, तिचा दुसरा डोस उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे नागरिक त्यांच्या पसंतीनुसार लसीची मागणी करत नाहीत. जी लस उपलब्ध आहे, ती लस दिली जात आहे.
कोव्हॅक्सिन २८ दिवसांनंतर तर कोविशिल्ड ८४ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जातो. त्यानुसार आरोग्य विभागातून नियोजन केले जात आहे.