आगामी निवडणुकांसाठी बुथ रचना बळकट होणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST2021-07-20T04:15:27+5:302021-07-20T04:15:27+5:30
येथील बालाजी मंदिर सभागृहात भाजपाच्या शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आ. गोविंद केंद्रे, माजी ...

आगामी निवडणुकांसाठी बुथ रचना बळकट होणे गरजेचे
येथील बालाजी मंदिर सभागृहात भाजपाच्या शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आ. गोविंद केंद्रे, माजी आमदार तथा अ. जा. मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, जि. प. सदस्य रामचंद्र तिरुके, प्रा. विजय क्षीरसागर, किसान संघटनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, माजी सभापती संजय दोरवे, तालुकाध्यक्ष अरविंद नागरगोजे, माजी नगराध्यक्ष किसन धुळशेट्टे, व्यंकट तेलंग, जिल्हा उपाध्यक्ष सोमेश्वर सोप्पा, बालाजी केंद्रे, बालाजी मालुसरे, पंडित सूर्यवंशी, दत्ता वंजे, धनराज बिरादार, अविनाश नळंदवार, तुकाराम मद्दे, तालुका सरचिटणीस सत्यवान पांडे आदी उपस्थित होते.
यावेळी आ. कराड म्हणाले, पक्षसंघटन मजबूत करणे महत्त्वाचे आहे. आगामी सर्व निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना अनुदान दिले.
यावेळी आ. सुधाकर भालेराव म्हणाले, पक्षासाठी एकनिष्ठेने काम केले आहे. नगरपंचायतीवर झेंडा फडकविला. आगामी निवडणुकीत झेंडा फडकविण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
प्रास्ताविक सोमेश्वर सोप्पा, तर सूत्रसंचालन रत्नाकर केंद्रे यांनी केले. आभार दत्ता वंजे यांनी मानले.