सुप्रिया वायगावकर यांना ‘ग्लॅमरस क्वीन’ किताब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST2021-07-20T04:15:36+5:302021-07-20T04:15:36+5:30

वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विवाहित महिला डॉक्टरांसाठी सौन्दर्य स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेचे दुसरे ...

The book 'Glamorous Queen' by Supriya Vaigaonkar | सुप्रिया वायगावकर यांना ‘ग्लॅमरस क्वीन’ किताब

सुप्रिया वायगावकर यांना ‘ग्लॅमरस क्वीन’ किताब

वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विवाहित महिला डॉक्टरांसाठी सौन्दर्य स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेचे दुसरे पर्व होते. यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून सुमारे २०० महिला डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. त्यातून ४० स्पर्धक अंतिम फेरीमध्ये पोहोचले. या स्पर्धकांमधून ६ विनर घोषित करण्यात आले. ही केवळ सौंदर्य स्पर्धा नसून, यामध्ये सहभागी डॉक्टारांचे सामाजिक कार्य, वैद्यकीय क्षेत्रातील काम, कलागुण, फिटनेस, छंद अशा अनेक गोष्टींचा विचार केला जात असल्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रेरणा बोरी-कालेकर यांनी सांगितले. समन्वयक म्हणून डॉ. प्राजक्ता शहा, परीक्षक म्हणून प्रसिद्ध अभिनेते समीर धर्माधिकारी, डॉ. कांचन मदार, डॉ. मीनाक्षी देसाई, डॉ. अश्विनी पाटील, पूजा वाघ यांनी काम पाहिले. डॉ. सुप्रिया वायगावकर यांच्या यशाचे कौतुक होत आहे.

Web Title: The book 'Glamorous Queen' by Supriya Vaigaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.