वैद्यकीय शिक्षण नसताना टाकला दवाखाना; करडखेल पाटीयेथील बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
By संदीप शिंदे | Updated: August 30, 2022 16:34 IST2022-08-30T16:32:27+5:302022-08-30T16:34:05+5:30
आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने उदगीर तालुक्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

वैद्यकीय शिक्षण नसताना टाकला दवाखाना; करडखेल पाटीयेथील बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
उदगीर : तालुक्यातील करडखेल पाटी येथे तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका आरोग्य अधिकारी, तसेच ग्रामीण पोलिसांच्या पथकाने धाड टाकून, एका बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने उदगीर तालुक्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली, तालुका आरोग्य अधिकारी आणि ग्रामीण पोलिसांच्या पथकाने सोमवारी उदगीर तालुक्यातील करडखेल पाटी येथे प्रभाकर मधुकर डोंगरे यांच्या क्लिनिकवर धाड टाकली. संबंधिताकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी कोणतेही प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय व्यवसायाचे नोंदणी क्रमांक आढळले नाहीत. याप्रकरणी पथक प्रमुख डॉ. प्रशांत कापसे यांच्या तक्रारीवरुन उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.