रक्तदान मोहीम जिल्ह्यात गतिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:47+5:302021-07-11T04:15:47+5:30
लातूर : रक्तदान हे जीवदान देणारे सर्वश्रेष्ठ दान आहे. कोरोनाकाळात तरूणांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन ...

रक्तदान मोहीम जिल्ह्यात गतिमान
लातूर : रक्तदान हे जीवदान देणारे सर्वश्रेष्ठ दान आहे. कोरोनाकाळात तरूणांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन प्रसिध्द प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांनी शनिवारी येथे केले. लोकमत आयोजित रक्तदान मोहिमेंतर्गत डॉ. लहाने हॉस्पिटलमध्ये शिबिर झाले. यावेळी डॉ. लहाने यांनी स्वत: रक्तदान केले. ते म्हणाले, लोकमत वृत्तपत्र समूहाने राज्यात सुरू केलेल्या मोहिमेमुळे हजारो रूग्णांना लाभ होत आहे. कोरोना काळात रक्ताची मोठी गरज निर्माण झाली. ज्यावेळी मोहीम सुरू झाली, तेव्हा राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये अपुरा साठा होता. ‘लोकमत’च्या गावागावातील शिबिरांमुळे प्रत्येक जिल्ह्यात गरजू रूग्णांना सहज आणि सुलभतेने रक्त मिळणार आहे. यावेळी डॉ. राजेश शहा, दुष्यंत बुरबुरे, ज्ञानेश्वर शिंदे, मुकेश वरटे, गोपाळ सूर्यवंशी उपस्थित होते.
१५ जुलैपर्यंत मोहीम : उपमहापौर बिराजदार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीच्यावतीने डॉ. आंबेडकर पार्क येथेही तरूणांनी रक्तदान केले. यावेळी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, अध्यक्ष निखील गायकवाड उपस्थित होते. या शिबिरात उपमहापौर बिराजदार यांनी रक्तदान केले. उपमहापौर बिराजदार म्हणाले, ‘लोकमत’ने सुरू केलेली रक्तदान चळवळ १५ जुलैपर्यंत आहे. शहरातील विविध संस्था, संघटनांनी तसेच तरूणांनी रक्तदान करून यात सक्रिय सहभाग नोंदवावा.
कॅप्शन : प्रसिध्द प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांनी रक्तदान केले. यावेळी डॉ. राजेश शहा, प्रा. उदय देशपांडे, डॉ. दुष्यंत बुरबुरे, ज्ञानेश्वर शिंदे, मुकेश वरटे, नरसिंग माने उपस्थित होते.