छावा संघटनेतर्फे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:26 IST2021-08-17T04:26:00+5:302021-08-17T04:26:00+5:30
बँड, बॅन्जो वादकांना आर्थिक मदतीची मागणी लातूर : कोरोनामुळे बँडबाजा चालक, वादक अडचणीत आहेत. अनेक चालक, वादकांवर बँडचे साहित्य ...

छावा संघटनेतर्फे रक्तदान शिबिर
बँड, बॅन्जो वादकांना आर्थिक मदतीची मागणी
लातूर : कोरोनामुळे बँडबाजा चालक, वादक अडचणीत आहेत. अनेक चालक, वादकांवर बँडचे साहित्य विकून टाकण्याची वेळ आली आहे. बँड, बॅन्जो वादक, चालकांना दहा हजारांची मदत करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे करण्यात आली. लग्न, मिरवणुका, जयंती कार्यक्रमात वाद्य लावले जात नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. अशा कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. निवेदनावर बळी शिंदे, तुकाराम पारडे, अनिल रणदिवे, प्रकाश मोगरगे, कुमार कांबळे, सदानंद शिंदे, महादेव जाधव, सतीश होनमाने, धनराज शेंडगे, गुरुनाथ कांबळे, विनायक बंडीधनगर, अतुल गायकवाड, आदींची नावे आहेत.
प्राध्यापकांचे प्रश्न मार्गी लावणार
लातूर : प्राध्यापकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, पीएचडी, एमफील आणि नेटच्या अनुषंगाने असलेले सर्व प्रश्न सोडविले जातील असे आश्वासन उच्च शिक्षण मंत्री उदय सावंत यांनी शिक्षक आ. विक्रम काळे व सिनेट सदस्य प्रा. डॉ. अशोक मोटे यांनी प्राध्यापकांच्या प्रश्नावर आयोजित केलेल्या बैठकीत दिले. आ. विक्रम काळे यांनी या बैठकीत मंत्री महोदयांसमोर विविध प्रलंबित प्रश्न मांडून लक्ष वेधले. यावेळी प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांच्यासह प्राध्यापकांची उपस्थिती होती.
श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात स्वातंत्र्यदिन
लातूर : श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मळवटी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव हरीश्चंद्र शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक युवराज शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मधुकर गरड, उमाकांत धोंडजी, सुहास माकणीकर, जाकरअली सय्यद, श्रीकृष्ण पवार, विलास गिरी, चंद्रकांत चोपले, रंगनाथ माळी, बिटाजी भोसले, सुनिल आगलावे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
दयानंद महाविद्यालयात आझादी का अमृत महोत्सव
लातूर : येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव या उत्सवाअंतर्गत उपक्रम साजरे करण्यात आले. यावेळी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. साईनाथ उमाटे, ऋषिकेश भोसीकर, योगेश देशपांडे, वैभव ठाकुर, अभिजित सुतार, अजय घाडगे, गणेश सावंत, असिफ शेख, विकास भोसले, सुरज जगताप, वेदिका गोरे, आरती सूर्यवंशी, सुजान हन्नूरे, पूनम साळुंके, पूनम दिवटे आदींसह स्वयंसेवकांची उपस्थिती होती.