चाकुरातील शिबिरात १०१ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:39+5:302021-07-11T04:15:39+5:30
येथील नगरपंचायत सभागृहात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन तब्बल १०६ वेळा रक्तदान केलेले विनायक भाऊराव पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ...

चाकुरातील शिबिरात १०१ जणांचे रक्तदान
येथील नगरपंचायत सभागृहात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन तब्बल १०६ वेळा रक्तदान केलेले विनायक भाऊराव पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे होते. यावेळी तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक लांडे उपस्थित होते.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिशन तेलंग, डॉ. संजय स्वामी, डॉ. आनंद गांजुरे, डॉ. एन. जी. मिर्झा, पोलीस उपनिरीक्षक खंडू दर्शने, माजी सरपंच गंगाधरराव केराळे, सुधाकरराव लोहारे, नगरसेवक ॲड. संतोष माने, शिवकुमार सोनटक्के, नारायण बेजगमवार, सिद्धेश्वर पवार, गौरीशंकर शेटे, माजी प्राचार्य शिवाजीराव नवरखेले, प्रा. बी. डी. पवार, रोटरी क्लबचे अध्यक्ष शिवदर्शन स्वामी, राजेश्वर डुमणे, ओमप्रकाश लोया, मधुकर कांबळे, दत्तात्रय बेंबडे, सतीश गाडेकर, सलीम तांबोळी, माधवराव वाघ, समाधान जाधव, सागर होळदांडगे, राजू बलशेटवार, बाळू डुमणे, मनीष अंकलकोटे, अजय धनेश्वर, अजित घंटेवाड, सचिन तोरे, बिलाल पठाण, तानाजी आरदवाड, पाराजी पुट्टेवाड, विवेक डुमणे, रामेश्वर साने, लक्ष्मण जाधव, आदी उपस्थित होते. शिबिरास महिलांचाही प्रतिसाद मिळाला. महिला रक्तदात्यांसाठी न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल येथे सोय करण्यात आली होती.
‘लोकमत’चे तालुका वार्ताहर संदीप अंकलकोटे यांनी प्रास्ताविक केले. वार्ताहर यादव करडिले यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी वार्ताहर भरतसिंह ठाकूर, बालाजी पेन्सलवार, संग्राम होनराव, अमोल शिंदे, आदींनी परिश्रम घेतले. रक्तसंकलनासाठी लातूर ब्लड बँकेचे नयन पाटील, डॉ. विलास खानापुरे, कृष्णा चाटे, सुशांत तिडके, सविता माळी, अंकिता गंगणे, माउली मुंडे, अजय राठोड, आदेश बिराजदार, आदींनी सहकार्य केले.
कॅप्शन : ‘लोकमत - रक्ताचं नातं’ मोहिमेअंतर्गत चाकूर येथे शनिवारी आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन १०६ वेळा रक्तदान केलेले विनायक भाऊराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक लांडे उपस्थित होते.