पार्क प्रवेशद्वारासमोर डोळ्याला काळी पट्टी बांधून आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:13+5:302021-07-11T04:15:13+5:30

लातूर : शहरातील लाेकनेते विलासराव देशमुख पार्कसमोर नागरिकांनी डोळ्यावर पट्टी बांधून अनाेखे आंदोलन करत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध नाेंदवला. या ...

A blindfold in front of the park entrance | पार्क प्रवेशद्वारासमोर डोळ्याला काळी पट्टी बांधून आंदाेलन

पार्क प्रवेशद्वारासमोर डोळ्याला काळी पट्टी बांधून आंदाेलन

लातूर : शहरातील लाेकनेते विलासराव देशमुख पार्कसमोर नागरिकांनी डोळ्यावर पट्टी बांधून अनाेखे आंदोलन करत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध नाेंदवला.

या पार्कमध्ये सकाळी-संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक, महिला, बालके फिरण्यासाठी माेठ्या संख्येने येतात. काही महिन्यांपासून येथे एका खासगी कंपनीने मनमानी करत फिरण्याचा ट्रॅक बंद केला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांना फिरण्यासाठी असलेला परिसर पुन्हा खुला करण्यात यावा, यासाठी नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवली हाेती. त्याबाबतचे निवेदनही मनपा आयुक्तांना दिले हाेते. अद्यापही यावर कुठलाही ठाेस निर्णय घेण्यात आलेला नाही. उलट संबंधित खासगी कंपनीची मनमानी वाढू लागल्याचा आराेपही आंदाेलकांनी केला आहे. येथील काही परिसर जाळी लावत बंद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून आले. ही परिस्थिती पाहून आता नागरिकच संभ्रमात आहेत. याविराेधात शनिवारी प्रवेशद्वारावरच डोळ्यावर काळी पट्टी बांधून निषेध आंदाेलन करण्यात आले.

यावेळी मनसेचे शहर संघटक ॲड. अजय कलशेट्टी, सूर्यप्रकाश धूत, बंडाप्पा जवळे, ॲड. श्रीशैल्य उडगे, ॲड. शिरीष धहीवाल, डॉ. राजकुमार तोष्णीवाल, महेश सुकाळे, महानंदा हमीने, माधुरी चौधरी, मीना चंदिले, जयाबाई त्रिमुखे, मंगला हलवाई, अलकनंदा माने, सोमनाथ खुदासे, सुभाष माशाळकर, रमेश मुळे, संतोष वडवले, हेमंत वडणे, उमाकांत बट्ट्यावार, दीपक प्रयाग, विश्वनाथ धुळे, बिराजदार, श्रीराम कोळेकर, शिरीष माळी, लिंबाळप्पा दाणे, गजानन हुंडेकरी, अशोक पंचाक्षरी, हुसेन पठाण, मोतीराम कदम, पारस चापसी, शिवा धुळे, मन्मथप्पा पोपडे, सुधीर आडगावकर, आनंद जवळे, शिवा रोडे, अजय कामदार आदी उपस्थित हाेते.

Web Title: A blindfold in front of the park entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.