शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा ‘बीजेएस’चा निर्धार- शांतिलाल मुथ्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 01:46 IST

६ कोटी क्युबिक मीटर जलसाठ्याची क्षमता वाढविणार

लातूर : भारतीय जैन संघटनेने जूनअखेरपर्यंत राज्यातील बुलडाणा, लातूर, उस्मानाबाद, अकोला व वाशिम हे पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. जलसंधारणाची कामे करून ६ कोटी क्युबिक मीटरपेक्षा जास्त जलसाठा वाढविला जाणार असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी गुरुवारी येथे पत्रपरिषदेत दिली.मुथ्था म्हणाले, भारतीय जैन संघटना ३३ वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक कार्यात सहभागी आहे. किल्लारीतील भूकंपानंतर तेथील १० हजार नागरिकांना दररोज भोजन दिले. तसेच १ हजार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले होते. महाराष्ट्र सहा वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करीत आहे. त्यामुळे भारतीय जैन संघटनेने दुष्काळमुक्त अभियान राबविण्यास सुरुवात केली. २०१३ मध्ये बीड जिल्ह्यातील ११७ तलावांतून २० लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला. त्यामुळे ५ हजार एकर शेतजमीन सुपीक झाली. त्यानंतर बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत नाला रुंदीकरण व खोलीकरणाची कामे करण्यात आली. पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या ३० तालुक्यांतील गावांना ५०० मशीन्स उपलब्ध करून देण्यात आल्या.२०१८ च्या पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेतील ७५ तालुक्यांतील दीड हजार गावांना १६२५ जेसीबी मशीन भाड्याने घेऊन उपलब्ध करून देण्यात आल्या. या मशीनचा ८ लाख ५२ हजार तास वापर झाला. त्यामुळे ५ कोटी क्युबिक मीटर जलसाठ्याची क्षमता वाढली. ३ मार्च २०१८ रोजी बुलडाणा येथे १३४ जेसीबी व पोकलेन मशीन उपलब्ध करून कामास सुरुवात केली. तीन महिन्यांच्या कालावधीत ५० लाख क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात दुष्काळ मुक्ती अभियानचे उद्घाटन ३० सप्टेंबर रोजी किल्लारी येथे होईल.शासनाकडून डिझेल पुरवठालोकसहभाग, लोकप्रतिनिधी, सरकारी यंत्रणेची मदत तसेच सेवाभावी संस्था, सीएसआर कंपन्यांच्या सहकार्यातून कामे केली जाणार आहेत. शासनाने डिझेल पुरवठा करावा, असा करारही झाला आहे. भारतीय जैन संघटना जेसीबी, पोकलेन मशीन उपलब्ध करून देऊन कामावर देखरेख ठेवेल. जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचे मॉडेल तयार करून त्यानुसार काम करण्यात येणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळShantilal Muttha Foundationशांतीलाल मुथ्था फाउंडेशन