भाजपाचे बुधवारी जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:37 IST2021-02-21T04:37:31+5:302021-02-21T04:37:31+5:30

जिल्ह्यात विधानसभा निहाय जेलभरो आंदोलनाचे नेतृत्‍व लातूर ग्रामीण आणि लातूर शहर विधानसभेसाठी माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्‍हाध्‍यक्ष ...

BJP's jail-wide agitation on Wednesday | भाजपाचे बुधवारी जेलभरो आंदोलन

भाजपाचे बुधवारी जेलभरो आंदोलन

जिल्ह्यात विधानसभा निहाय जेलभरो आंदोलनाचे नेतृत्‍व लातूर ग्रामीण आणि लातूर शहर विधानसभेसाठी माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड, अहमदपूर खा. सुधाकर शृंगारे, औसा आ. अभिमन्‍यु पवार, निलंगा अरविंद पाटील निलंगेकर, उदगीर भाजपा अनुसू‍चित जाती मोर्चाचे प्रदेशाध्‍यक्ष माजी आ. सुधाकर भालेराव यांच्या नेत्वृत्वाखाली होणार आहेत.

लॉकडाऊन काळात वीज ग्राहकांना अवाजवी बिले देण्‍यात आली. त्‍या वीज बिलांची तात्‍काळ दुरूस्‍ती करावी. शेतकऱ्यांना थकीत बील भरण्‍यासाठी कृषी संजीवनी योजना सुरू असतानाही थकबाकीमुळे वीज पुरवठा तोडण्‍याचे सुरू असलेले प्रकार तात्‍काळ थांबवावेत. साखर कारखान्‍यांनी त्‍वरीत एफआरपी प्रमाणे ऊसाची बिले द्यावीत, यासह विविध प्रश्‍नांवर जेलभरो आंदोलन करण्‍यात येणार आहे. या आंदोलनात भाजपाचे सर्व पदाधिकारी, वीज ग्राहक, शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेश कराड यांनी केले आहे.

Web Title: BJP's jail-wide agitation on Wednesday